शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विहीरगाव उपकेंद्राचे काम पाच वर्षांपासून थंडबस्त्यात

By admin | Updated: August 13, 2015 01:47 IST

शासनाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या राज्यातील १४ परिमंडलात ६२३ नवे वीज उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून विदर्भाच्या ११ जिल्ह्यासाठी ११३ नवे वीज उपकेंद्र मंजूर केले आहेत.

सास्ती : शासनाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या राज्यातील १४ परिमंडलात ६२३ नवे वीज उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून विदर्भाच्या ११ जिल्ह्यासाठी ११३ नवे वीज उपकेंद्र मंजूर केले आहेत. परंतु यापूर्वीच शासनाने मंजूर केलेले अनेक वीज उपकेंद्राचे काम थंडबस्त्यात आहेत. राजुरा तालुक्यातील पाच वर्षांपूर्वी मंजूर केलेले विहीरगाव येथील वीज उपकेंद्राचे काम अजूनही थंडबस्त्यात आहे. अशा मंजूर उपकेंद्राचे काम प्रथम सुरू करावे व नंतरच नवे वीज उपकेंद्र मंजूर करावे, असा टाहो विहीरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी फोडला आहे.राज्यात विजेच्या अनियमित होणाऱ्या पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. पाऊस पडण्याआधी शेतकऱ्यांचे शेतातील उभे पीक नष्ट झालीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. सिंचनाची सोय उपलब्ध असूनही अनियमित व अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यामागील कारणही तसेच आहे. वीज केंद्रावरुन मोठ्या प्रमाणात कृषी पंपाची जोडणी असल्यामुळे योग्य व नियमित वीज पुरवठा पुरविला जाऊ शकत नाही. त्यामुळे उपकेंद्र स्थापन करणे गरजेचे होते. शासनाने वीज उपकेंद्र मंजूरही केले. परंतु पाच वर्षे लोटूनही उपकेंद्राचे काम थंडबस्त्यात आहेत व आता नव्याने वीज उपकेंद्र मंजूर करुन शेतकऱ्याची थट्टाच केली जात असल्याचा सूर शेतकऱ्यांकडून निघत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विरुर उपकेंद्रावरुन राजुरा तालुक्यातील विहिरगाव, नलफडी, कोहपरा, पंचाळा, चनाखा परिसरातील गावात जवळपास १ हजार १०० शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो. परंतु हा पुरवठा अनियमित व अपुऱ्या दाबाचा होत असल्यामुळे शेतकरी सिंचनामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन याठिकाणी सन २०१० मध्ये विहिरगाव उपकेंद्र मंजूर केले. २०१३ मध्ये शेतकऱ्यांनी मोठा मोर्चा काढून प्रशासनाला धारेवर धरले होते. तेव्हाही अधिकाऱ्यांनी त्वरित काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र अजूनही उपकेंद्राचे काम सुरू झाले नाही. आजही परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या अपुऱ्या व अनियमित पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु अशा मंजूर उपकेंद्राचे काम सुरू न करता शासन मात्र नव्या वीज उपकेंद्राना मंजुरी देऊन शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा सूर शेतकऱ्यांमधून निघत आहे. प्रथम पूर्वी मंजूर केलेल्या वीज उपकेंद्राचे काम सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)शासनासोबतच प्रशासनही करतेय थट्टाप्रस्तावित विहीरगाव उपकेंद्राचे काम एन्फ्रा-२ मध्ये मंजूर झाले असून जागाही निश्चित झाली आहे. अंदाजपत्रक व टेंडरनही झाले आहे. सदर काम अतिआवश्यक यादीत घेऊन मंजुरीसाठी हेड आॅफीसला पाठविले आहे. मंजुरी मिळताच काम सुरू होईल अशी माहिती वीज वितरण कंपनी बल्लारपूरचे कार्यकारी अभियंता नितीन चोपडे यांनी मे महिन्यात सांगितले होते. परंतु अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. शासनही मंजूर कामे झाले की नाही हे न बघता नव्या कामांना मंजुरी देते तर प्रशासन लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन देते. दोघेही शेतक्यांची थट्टाच करीत असल्याचे दिसून येते.