शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याण विभागाचे सामाजिक न्यायाच्या दिशेने कार्य

By admin | Updated: July 1, 2017 00:38 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शोषित, पीडित व वंचित घटकांसाठी अनेक योजना राबवून त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीकरिता मोलाचे कार्य करीत आहे.

हंसराज अहीर : सामाजिक न्याय दिनाचा कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शोषित, पीडित व वंचित घटकांसाठी अनेक योजना राबवून त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीकरिता मोलाचे कार्य करीत आहे. त्यांचे हे कार्य सामाजिक न्यायाच्या दिशेने सुरू असल्याची ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण कार्यालयातर्फे सामाजिक न्यायदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य दिलीपकुमार राठोड, सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन व शाहू - फुले आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना गावातील शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील व त्या प्रभावीपणे कशा राबविता येतील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही पाहुण्यांनी यावेळी सांगितले. प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे व समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी महामानवाच्या जीवनावर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त केले. समाजाच्या कल्याणाकरिता असलेल्या योजना पाहून आपणही या विभागाशी जुळून काम केले पाहिजे, अशी इच्छा यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे यांनी व्यक्त केली.यावेळी महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या हिरामण उरकुडा खोब्रागडे व कांता सिद्धार्थ ढोके यांचा ना. अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनाचे औचित्य साधून व्यसनविरोधी पथनाट्य सादर करण्यात आले व दारुच्या व्यसनाने कुटुंब कसे उद्ध्वस्त होतात, याचे महत्व पटवून देणाऱ्या पथनाट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी, आभार समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन सचिन फुलझेले यांनी केले.