घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्रातील निलजई खुल्या कोळसा खाणीत ओ.बी. (माती) उत्खनन करणाऱ्या रुंगठा प्रोजेक्ट लि.कंपनीच्या कामगारांना नियमानुसार वेतन, कामाच्या वेळेनंतर काम केल्याचा अधिक मोबदला, आरोग्य व सुरक्षा बरोबरच अन्य मागण्या पूर्ण करण्याचे वेळोवेळी आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे सोमवारी संतप्त चालक व कामगारांनी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले.रुंगठा प्रोजेक्ट लि. वेकोलिच्या निलजई खुल्या कोळसा खाणीत ओ.बी. (माती) काढून कोळसा बेंच खुला करून देण्याचे काम मागील वर्षापासून करीत आहे. या कंपनीत चालक, हेल्पर बरोबरच मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. कामगारांना किमान वेतन, ओव्हर टाईम, आरोग्य सेवा, वेतनाची स्लीप, आठ तास काम, बोनस यासह अन्य मागण्यासंदर्भात दोनदा चर्चा झाल्या व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले मात्र आश्वासन पूर्ण केले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय देरकर यांच्यानेतृत्वात सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले. (वार्ताहर)
कामगारांचे काम बंद आंदोलन
By admin | Updated: November 3, 2015 00:31 IST