शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा : प्रशांत ठाकरे

By admin | Updated: May 1, 2017 00:38 IST

आयुष्याचा प्रवास यशासाठी असतो. त्यासाठी परीक्षा द्याव्याच लागतात. मात्र या परीक्षांतील यशासाठी तणावमुक्त राहा, हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा.

लोकमत व गायडन्स पॉर्इंटचा उपक्रम : विद्यार्थ्यांसाठी पार पडला सेमिनार व शिष्यवृत्ती परीक्षा चंद्रपूर : आयुष्याचा प्रवास यशासाठी असतो. त्यासाठी परीक्षा द्याव्याच लागतात. मात्र या परीक्षांतील यशासाठी तणावमुक्त राहा, हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा. तुमचे प्रयत्न तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहचवू शकते, असा मोलाचा सल्ला डॉ. प्रशांत ठाकरे यांनी दिला. लोकमत व एज्युटेशनच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आज रविवारी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन एज्युटेशन डायरेक्टर मयूर वनकर यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून एज्युटेशनचे व्यवस्थापक मंजुषा हिंगाणे, लोकमत जिल्हा इव्हेंट प्रमुख अमोल कडूकर उपस्थित होते. डॉ. प्रशांत ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सेमिनारमध्ये देशातील प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती दिली. त्याच बरोबर जेईई मेन, जेईई अ‍ॅडव्हान्स व ‘नीट’ परीक्षेचे बदलते स्वरूप यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच जेईई मेन, अ‍ॅडव्हान्स व नीटची तयारी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावी, त्यात पालकांनी आपल्या पाल्याला कशाप्रकारे मार्गदर्शन करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली.दरम्यान, उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉ. प्रशांत ठाकरे यांना विविध प्रश्न विचारून शंकांचे निराकरण केले. एज्युटेशन डायरेक्टर मयूर वनकर यांनी अभ्यास कसा करावा, पालकांनी मुलांकडे कशा प्रकारे लक्ष द्यावे, परीक्षेसाठी कशी तयारी करावी आदी विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाखणण्याजोगे होता. सेमिनारमध्ये २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा इव्हेंट प्रमुख अमोल कडूकर यांनी तर आभार लोकमत सखी मंच सयोजिका पूजा ठाकरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. (प्रतिनिधी)