शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींची कामे ठप्प

By admin | Updated: November 12, 2016 00:48 IST

चिमूर पंचायत समितीपासून सुरु झालेल्या ग्रामसेवकांच्या असहकार आंदोनाने मोठे रुप धारण केल्याने जिल्हाभर

ग्रामसेवकांचे आंदोलन : जिल्हा प्रशासनाचे वेधले लक्षचंद्रपूर : चिमूर पंचायत समितीपासून सुरु झालेल्या ग्रामसेवकांच्या असहकार आंदोनाने मोठे रुप धारण केल्याने जिल्हाभर ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन केले. मात्र यावर प्रशासनाने कुठलाच तोडगा न काढल्याने ग्रामसेवक युनियने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे शुक्रवारी ग्रामपंचायत पातळीवरील कामे ठप्प पडली.कंत्राटी ग्रामसेवकांचा ३ वर्षे सेवाकाळ नियमीत करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना दरमहा प्रवास भत्ता पगारासोबत द्यावे, ग्रामसेवक संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेत बदल करून पदवीधर करावे, ग्रामसभेची संख्या मर्यादित असावी व इतर यंत्रणा ग्रामसभा सचिव व बदल होणे व ग्रामसभा सुधारणा करणे, २०११ च्या जनगणनेवर आधारीत राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे निर्मीती करावी, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा व्हावी, ग्रामसेवक संवर्गाकरिता वैद्यकीय कॅशलेस सुविधा मिळण्यासाठी निर्णय घ्यावा, राज्यस्तर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करावे अशा १५ मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविण्यात आले.ग्रामस्तरावर काम करताना नागरिकांसह गावपुढारी, प्रशासकीय अधिकारी यांच्याही रोषाला बळी पडून ग्रामसेवक काम करतात. मात्र ग्रामसेवकाच्या अनेक मागण्यासाठी शासनाला वेळोवेळी निवेदन देवूनही ग्रामसेकाच्या मागण्या सुटल्या नसल्याने ग्रामसेवक युनियनने प्रशासनाविरुद्ध आंदोलनाची शृंखला सुरु केली असून यात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे काम ठप्प पडल्याने गाव खेड्यातील नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. (स्थानिक प्रतिनिधी)