शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

१२ वर्षांपासून घोडाझरी उपकालव्याचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

गोसेखुर्द प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि १०७ किमी लांबीचा उजवा कालवा ब्रह्मपुरी तालुक्यातून सावलीकडे गेला आहे. या कालव्याच्या माध्यमातून आसोला मेंढा तलावात पाणी सोडले जात आहे. तालुक्यातून घोडाझरी उपकालवा गेला आहे. दहा वर्षांपूर्वी उपकालव्याचे काम सुरू झाले होते. मात्र अजुनही अर्धवटच आहे. हा कालवा पान्होळी, मेंढा, किरमिटी, नवेगाव पांडव, कोदेपार येथून गेला. कालव्यातून निघालेल्या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकठिकाणी मातीचे डोंगर तयार केले.

ठळक मुद्देअर्धेच बांधकाम पूर्ण : मातीच्या डोंगरामुळे शेकडो एकर शेती नापिक

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातून गेलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याचे काम कासवगतीने सुरू आहे. बांधकामाला १२ वर्षे झाले. मात्र, कालव्याचे निम्मे बांधकाम पूर्ण झाले. प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालव्यापाासून शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही. तर दुसरीकडे कालव्याच्या मातीचे ढिगारे उभे झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.गोसेखुर्द प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि १०७ किमी लांबीचा उजवा कालवा ब्रह्मपुरी तालुक्यातून सावलीकडे गेला आहे. या कालव्याच्या माध्यमातून आसोला मेंढा तलावात पाणी सोडले जात आहे. तालुक्यातून घोडाझरी उपकालवा गेला आहे. दहा वर्षांपूर्वी उपकालव्याचे काम सुरू झाले होते. मात्र अजुनही अर्धवटच आहे. हा कालवा पान्होळी, मेंढा, किरमिटी, नवेगाव पांडव, कोदेपार येथून गेला. कालव्यातून निघालेल्या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकठिकाणी मातीचे डोंगर तयार केले. त्यामुळे शेकडो एकर जमीन नापिक झाली आहे.बांधकाम कंपन्याही बदलल्याकालव्याचे बांधकाम २००८ मध्ये सुरू झाले. पहिली तीन चार वर्षे काम सुरळीत सुरू होते. त्यानंतर शासनाने काही बांधकाम कंपन्यांची देयके अडवली. त्यामुळे काही कंपन्यांनी काम सोडल्याने तीन वर्षे बंदच होते. आता काही ठिकाणी नवीन कंपन्यांनी कामे घेतली. या कंपन्यांकडून कालव्याचे बांधकाम सुरू आहे.शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेतउपकालव्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली. यातील बहुतेक शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला तर काही शेतकरी प्रतीक्षेत आहेत. कालव्यासाठी ठिकठिकाणी निर्माण झालेले मातीचे डोंगर शेतीसाठी त्रासदायक झाले. बांधकाम पूर्ण न झाल्याने शेतीला पाणीही मिळत नाही, असे आजचे वास्तव आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पGhodazari Damघोडाझरी धरण