शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जांभुळघाट आरोग्य केंद्रातील कर्मचारी करतात दहशतीत काम

By admin | Updated: November 10, 2016 02:05 IST

चिमूर तालुक्यातील जांभुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध विभागात कार्यरत असलेले कर्मचारी अशोक पांढरे हे उपचारासाठी

केवलसिंह जुनि : कारवाई करण्याची मागणीचिमूर : चिमूर तालुक्यातील जांभुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध विभागात कार्यरत असलेले कर्मचारी अशोक पांढरे हे उपचारासाठी आलेल्या रुग्णांसोबत असभ्य वर्तणूक करतात. तसेच आपल्या कार्यात कसूर करतात. व सहकारी महिला कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देतात. तसेच आपल्या सहायक कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याची भिती दाखवतात. त्यामुळे आरोग्य केंद्रातील महिला, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यात दहशत पसरली आहे. याचा परिणाम रुग्णांवर होत आहे. त्यामुळे सहकर्मचाऱ्यात दहशत निर्माण करून रुग्णांसोबत असभ्य वर्तन करणारा औषध निर्माता अशोक पांढरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख केवलसिंह जुनि व गावकऱ्यांनी केली आहे.ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या गावाजवळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. चिमूर पासून १२ किमी अंतरावर असलेल्या जांभुळघाट येथे शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. या आरोग्य केंद्रात आंबेनेरी, कपली, पिंपळगाव, मालेवाडा, सावरगाव, पिंपळगाव, लोधरा अशा अनेक गावातील रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांलयात आलेले रुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून औषधीसाठी गेले असता त्यांच्यासोबत असभ्य वर्तन करून औषधी योग्य देत नसल्याच्या तक्रारी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी येथील शिवसेना उपतालुका प्रमुख केवलसिंह जुनि यांच्याकडे केली. या रुग्णाची तक्रारीची दखल घेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रात कार्यरत अशोक पांढरे यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी आरोग्य मंत्री, पालकमंत्री व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. पांढरे यांच्यावर कारवाई न केल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारासुद्धा शिवसेना तालुका उपप्रमुख केवलसिंह जुनि यांनी दिलेला निवदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांच्या तक्रारीला केराची टोपलीऔषध निर्माण अधिकारी अशोक पांढरे हे सहकर्मचाऱ्यासोबत उद्धटपणाने वागणूक करतात. तसेच माझ्या कार्यालयात कुणी यायचे नाही. मी तुमचा अधिकारी असल्याने मी तुमचे काहीही करू शकतो.तसेच आशा वर्करला सुद्धा अपमानास्पद वागणूक देतात. या आशयाची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांना वैद्यकीय अधिकारी जांभुळघाट यांच्यामार्फत १२ आॅगस्ट २०१६ ला दिली. मात्र या तक्रारीवर अजुनही कारवाई करण्यात आलेली नाही.