शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारशहा रेल्वे पीट लाईनचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST

वसंत खेडेकर फोटो बल्लारपूर: प्रवास बसचा असो की रेल्वेचा अथवा विमानाचा, त्यात स्वच्छता आणि वाहनांची परिपूर्ण सुरक्षितता आवश्यक ठरते. ...

वसंत खेडेकर

फोटो

बल्लारपूर: प्रवास बसचा असो की रेल्वेचा अथवा विमानाचा, त्यात स्वच्छता आणि वाहनांची परिपूर्ण सुरक्षितता आवश्यक ठरते. रेल्वेबाबत तर या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ! एकमेकांशी जोडलेल्या २४-२५ डब्यांच्या गाडीत एकाच वेळेला सुमारे १५०० च्या वर प्रवासी असतातच. त्यामुळे, रेल्वेला गाडीच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच जागरूक राहावे लागते. रेल्वे गाड्यांच्या सुरक्षिततेची काटेकोरपणे काळजी घेण्याकरिता काहीच मोजक्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर पीट लाईनची व्यवस्था आहे.

त्या ठिकाणी रेल्वे गाड्यांची परिपूर्ण तपासणी तसेच डब्याची स्वच्छता केली जाते. गाडीची स्वच्छता आणि सुरक्षितता याची काळजी घेण्याचे पीट लाईन हे महत्त्वाचे ठिकाण ! बल्लारशहा हे मध्य रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे स्थानक. त्यामुळे या स्थानकावर पीट लाईन बसविले जात आहे. सुमारे ८ कोटी रुपये खर्च करून ५८५ मीटर लांबीच्या या पीट लाईनचे काम वेगाने सुरू असून या वर्षीच्या जून पर्यंत ते कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. ही पीट लाईन बल्लारशहा रेल्वे स्थानकापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला उभारली जात आहे.

बल्लारशहाला थेट लाईन असावी अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी सतत संपर्क साधत या मागणीचा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन येथे पीट लाईन मंजूर झाली व त्याचे भूमिपूजन अहिर यांच्या हस्ते डिसेंबर २०१९ ला झाले.

बॉक्स

२५ डब्यांची होईल स्वच्छता

बल्लारशहा रेल्वे स्थानक हे एनएसजी ४ या श्रेणीत मोडते.

त्या स्थानकावर सहा डब्याची स्वच्छता करण्याची व्यवस्था पूर्वीपासून आहे. पीट लाईनमुळे एकाच वेळेला २५ डब्याची स्वच्छता व सुरक्षितता तपासणी केली जाणार आहे.

मध्य रेल्वे मुंबई समितीचे सल्लागार सदस्य अजय दुबे यांनी निर्माणाधीन पीट लाईन स्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली.