शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या अंत्यविधीसाठी भद्रावती नगरपालिकेकडून लाकडाचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:07 IST

जीवन कितीही धकाधकीचे आणि संघर्षाचे गेले तरी आयुष्याचा शेवट गोड व्हावा, अशीच साऱ्यांची आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात अपेक्षा असते. परंतु, नशिबाचे भोग भोगताना अनेकांच्या वाट्याला एकटेपणा, निराश्रीत व गरिबीचे जीवन येतात.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी: गरिबांना होत आहे मदत

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती: जीवन कितीही धकाधकीचे आणि संघर्षाचे गेले तरी आयुष्याचा शेवट गोड व्हावा, अशीच साऱ्यांची आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात अपेक्षा असते. परंतु, नशिबाचे भोग भोगताना अनेकांच्या वाट्याला एकटेपणा, निराश्रीत व गरिबीचे जीवन येतात. अशा गोरगरिबांच्या अंत्यसंस्कारासाठी येथील पोलिकेतर्फे अंत्यसंस्काराच्या साहित्यातील लाकडू दान देत मागील वर्षभरापासून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यामुळे समाजातील गोरगरीब, दारिद्र्यरेषेखालील परिवारांना शेवटच्याक्षणी का होईना, पालिका नाथ म्हणून उभी राहात असून, मागील वर्षभरात ५० कुटुंबाना ही मदत करण्यात आली आहे.जगणं, मरणं एका श्वासाचं अंतर असल तरी आज पैसा, वैभव व प्रतिष्ठेच्या मागे जग धावताना दिसते. या आभासी जगात धडपडताना काहींना आपल्या सग्यासोयऱ्यांचाही विसर पडतो. इतकेच काय तर जन्मदात्या आईवडिलांनाही अनाथाश्रमाच्या पायºया चढाव्या लागतात. तर काहींना आयुष्यात अपघाताने एकटेपण येते. तेव्हा आयुष्यात केलेली धावपळ, मिळविलेले वैभव आणि संपती सारे निरर्थक ठरते. अशावेळी त्यांच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारीही दुसºयांच्या खांद्यावर येऊन पडते. अंत्यसंस्काराचे साहित्य खरेदी करायला आलेल्यांना पैसे मोजावे लागतात. त्यातही काहीवेळा तडजोड करण्याची वेळ येते. हीच परिस्थितीलक्षात घेत पालिका प्रशासनाने मागील एक वर्षापूर्वी ठराव घेवून अशा गोरगरिबाला अंत्यविधीसाठी मयतीच्या सामुग्रीत तीन मन लाकडी काड्या देवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा निर्णय घेतला.शहरातील भद्रनागस्वामी देवस्थान परिसरातील शहराच्या मध्यभागी असलेल्या ताजुद्दीन टिंबर मार्ट यांच्याकडे सदर सामुग्री देण्याचे कंत्राट पोलिकेतर्फे देण्यात आले असून, गोरगरीब कुटुंब या पालिकेच्या उपक्रमाचा लाभ घेत आहे. पालिकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.