शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हवे सजग नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:39 AM

शेतकरी, शेतमजुरांसह सर्व श्रम करणाऱ्या समूहांना सुखी व समाधानाने जगण्याचा हक्क आहे. यासाठी केंद्र व राज्याच्या सभागृहात जनतेने खऱ्या अर्थाने लोकोपयोगी कायदे करण्यासाठी प्रामाणिक तसेच अभ्यासु व सजग उमेदवारांना निवडून पाठविले पाहिजे,.....

ठळक मुद्देगुणवंत हंगरगेकर : कृषी महोत्सवाच्या समारोपीय सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शेतकरी, शेतमजुरांसह सर्व श्रम करणाऱ्या समूहांना सुखी व समाधानाने जगण्याचा हक्क आहे. यासाठी केंद्र व राज्याच्या सभागृहात जनतेने खऱ्या अर्थाने लोकोपयोगी कायदे करण्यासाठी प्रामाणिक तसेच अभ्यासु व सजग उमेदवारांना निवडून पाठविले पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष व शेतीतज्ज्ञ गुणवंत हंगरगेकर यांनी केले. येथे आयोजित शेतकरी संघटनेच्या कृषी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप तर प्रमुख अतिथी माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, माजी आमदार सरोज काशीकर, पुरातत्व विभागाचे माजी संचालक डॉ. जी.एस खाजा, उद्योजक रतिलाल चव्हाण, डाँ. दाभेरे, बी. के. खाजा, बाजार समिती सभापती कवडू पोटे, उपसभापती नारायण गड्डमवार,रंभा गोठी, सतीश दाणी, उल्हास कोटमकर, तेजस्विनी कावळे, अरुण नवले, अ‍ॅड. मुरलीधर देवाळकर, निळकंठ कोरांगे, रमेश नळे, सिंधु बारसिंगे, रविंद्र गोखरे, प्रभाकर ढवस, भाऊजी किन्नाके, अ‍ॅड. श्री निवास मुसळे, ज्योती तोटेवार, कमल वडस्कर, हरिदास बोरकुटे,नानाजी पोटे, संजय करमनकर, रवी गोखरे, आबाजी ढवस, अँड. राजेंद्र जेनेकर, सुभाष रामगिरवार, रमाकांत मालेकर आदी उपस्थित होते. अ‍ॅड. चटप म्हणाले, या महोत्सवातून शेतकºयांचे आत्मभान जागृत झाले आहे. नवीन तंत्रज्ञानाची व शेतीसंबंधी विविध विषयांचे विचारमंथन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे शेतकरी अधिक प्रगल्भ होऊन आपल्या व्यवसायाकडे नव्या दृष्टिकोनाने बघू शकेल, असेही त्यांनी सांगितले. कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुटीचा, सरकारी शोषणाचा, शेतमालाच्या किंमतीचा, देशावरील कर्ज व अर्थशात्राचा विषय समजून घेऊ शकले. सन्मानासाठी आता लढाईला सिद्ध होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगिले. माजी आमदार काशीकर म्हणाल्या, विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना कुणी दिसत नाही, ही उणिव भरून काढण्याची शेतकऱ्यांनी जबाबदार नेतृत्वाला पुढे नेले पाहिजे. कायद्याची जाण असणारा माणूस विधीमंडळात पाहिजे. डॉ. खाजा यांनी वेगळा विदर्भ मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणे दुरापास्त असल्याचे सांगितले.प्रास्ताविक प्रभाकर दिवे, संचालन प्राचार्य अनिल ठाकूरवार यांनी केले. कपिल इद्दे यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी बंडू राजुरकर, अभिजित सावंत, अनंता येरणे, पी. यु. बोंडे, आबाजी धानोरकर, नरेंद्र काकडे, बंडू माणुसमारे, हसनभाई रिझवी, दिनकर डोहे आदींसह राजुरा, कोरपना तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.जागृत शेतकऱ्यांचा सत्कारविविध क्षेत्रात उत्तम कार्य करणारे किसन अवताडे, गोसाई देरकर, रंभा नवरतन गोठी, रूखमा राठोड, संतोष आस्वले, किसन महात्मे, श्यामराव ठाणेकर, शेख खाजा, देवाजी हुलके, खुशाल सोयाम, मारोती लोहे, आबाजी धानोरकर, बाबुराव चिकटे, देविदास वारे, डॉ. मुसळे, दोरखंडे, डॉ. निरंजने, भिवसन गायकवाड, फकरु मडावी, अनिल वलादे, कुंडगीर, बाबुराव चिकटे, अंजना पेंदोर, विमल गेडाम, मुकुंद चन्ने आदींचा महोत्सवात सत्कार करण्यात आला.