राजुऱ्यातील महिला संतप्त : पेठवार्डातील विहीर चोरीला गेल्याची तक्रारराजुरा : राजुरा नगर परिषद हद्दीतील पेठ वॉर्डातील महिलांनी शुक्रवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालणावर घागर मोर्चा काढून रोष व्यक्त केला. यावेळी वॉर्डातील विहिर चोरीला गेल्याची तक्रार महिलांनी नोंदविली.पेठवार्डातील एक निजमकालीन विहिर चोरी गेल्याची तक्रार दिली होती. ही विहिर जिल्हा मध्यवर्ती बँकेने अपाल्या ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले. याबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. राजुरा पोलिसांनी तर चोरीला गेलेली विहिर सापडली असून ती विहिर बँकेच्या ताब्यात असल्याचा अहवाल दिला होता. विहिर नसल्यामुळे पेठ वॉर्डातील महिलांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मटका आंदोलन करुन मुख्याधिकारी यांच्या टेबलवर मडके ठेवण्यात आले. नगर पालिकेसमोरही काही वेळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पेठ वॉर्डातील नितीन पिपरे, अनिल ठाकरे, गोलु ठाकरे, विश्वास खिरटकर, शाहीद अहमद, माजीद कुरेशी, उमेश वाटेकर, नितेश संदूरकर, पुष्पा ठाकरे, सचिता पिपरे, ममता ढुमने, सुनंदा तंगडपल्लीवार, गिता भांदेगकर, पुष्पा झाडे, रेखा पिपरे, मंगला वाटेकर, आशा वाटेकर, आशा ठाकरे, रेखा ठाकरे, उषा जुमनाके सह पेठवार्डातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होते. (शहर प्रतिनिधी)
मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर महिलांचा घागर मोर्चा
By admin | Updated: October 22, 2016 00:44 IST