शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनो, अन्यायाविरुद्ध पेटून उठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:53 IST

महिलांवरील अन्यायाविरूध्द सर्व महिलांनी पक्ष, जात आणि धर्माचा विचार बाजूला सारुन पेटून उठावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री शोभाताई फ डणवीस यांनी केले.

ठळक मुद्देशोभाताई फडणवीस : महिला मंचचा रौप्य महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: महिलांवरील अन्यायाविरूध्द सर्व महिलांनी पक्ष, जात आणि धर्माचा विचार बाजूला सारुन पेटून उठावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री शोभाताई फ डणवीस यांनी केले. डॉ. जया द्वादशीवार स्मृतीप्रीत्यर्थ संयुक्त महिला मंचाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.महापौर अंजली घोटेकर यांनी रौप्य महोत्सवाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्याध्यक्ष विमल गाडेकर तर मंचावर डॉ. रजनी हजारे, डॉ. रेखा दांडेकर, उषा बुक्कावार व अन्य मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रांत कार्य करणाºया कार्यकर्त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी चंद्रपूरची हिरकणी या माहिती पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांनी केले.शिवाय सर्व हिरकणींचा शाल, श्रीफ ळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उषा बुक्कावार म्हणाल्या, गुणांची बेरीज व अवगुणांची वजाबाकी केली तर जीवनात प्रगती साधता येते. डॉ. रजनी हजारे यांनी प्रत्येक सेवा महत्वाची असून छोट्या छोट्या मदतीच्या रूपानेही समाजसेवा साधता येते. सांगीतले. डॉ. दांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी स्व. जया द्वादशीवार यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. विमल गाडेकर म्हणाल्या, संयुक्त महिला मंचाची स्थापना करून सर्वच जाती, धर्म आणि पक्षाच्या महिलांना एकत्र आणण्यात आले. यातून संयुक्त महिला मंच आकारात आले. कार्यक्रमानिमित्त नृत्य, गायन, भाषण तसेच एकपात्री प्रयोग स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारासाठी ललिता बेहरम, डॉ. प्रतिभा खोब्रागडे वर्षा कोडापे आदींनी सहकार्य केले. रोख रक्कम आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. परीक्षक म्हणून कुलचंद्र खोब्रागडे व भगवान गाडेकर यांनी काम केले. संचालन मंदा पडवेकर व मोना कांबळे आणि प्रास्ताविक डॉ. प्रतिभा खोब्रागडे यांनी केले. संगीता येरमे यांनी नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली.इंदुमती पाटील, ज्योती जीवने, शकुंतला वरभे, सत्यफु ला रायपूरे तसेच संयुक्त महिला मंच कार्यकर्त्या व पदाधिकाºयांनी सहकार्य केले.