गडचांदूर : अनेक थोर महिलांनी समाजाला योग्य दिशा दिली आहे. महिलांमुळेच समाज प्रगतिपथावर आहे. पुरुषांच्या कार्याबरोबर तिच्या कायार्ची तुलनाही करता येत नाही. महिलांनी सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन कार्य करावे, असे आवाहन राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले. गडचांदूर नगर परिषदेतर्फे आयोजित महिला मेळावा कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन कोरपनाच्या तहसीलदार पुष्पलता कुमरे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष विद्या कांबळे, ठाणेदार विनोद रोकडे, कोरपना पंचायत समितीचे माजी उपसभापती रुऊफ खान पठाण, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे, नगरपालिका सभापती रेखाताई धोटे, आनंदीबाई मोरे, हरिभाऊ मोरे, सुरेखा गोरे, नगरसेवक पापय्या पोनमवार, अरुणा बेतावार, कल्पना निमजे, शांताबाई मोतेवाड, विजयालक्ष्मी डोहे, नीलेश ताजने, शरद जोगी, अब्दुल हाफिज अब्दुल गणी व गडचांदूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी महिलाविषयक कायदे, महिला सुरक्षा व घ्यावयाची खबरदारी, महिलांचे आरोग्य व पर्यावरण, महिलांचे समाजातील शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्थान आदी विषयावर वैशाली टोंगे, वर्षा खरसान, डॉ. अपर्णा मार्गोनवार व डॉ. माया मसराम यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात माजी आमदार सुभाष धोटे म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना अनन्यसाधारण स्थान आहे. मातृशक्ती ही आपली प्रेरणा आहे, जगण्यातील ऊर्जा आहे, महिलांनी सावित्रीबाई फुले व माता जिजाऊंसारखे कार्य करावे. मेळाव्याचे औचित्य साधून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कास्यपदक विजेती मनीषा हरिभाऊ मोरे हिला माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
महिलांनी सावित्रीबार्इंची प्रेरणा घेऊन कार्य करावे -सुभाष धोटे
By admin | Updated: March 20, 2016 00:56 IST