शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी अन्यायाचा प्रतिकार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:43 IST

महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. मात्र, कायद्याच्या ज्ञानाअभावी अन्यायाविरुद्ध दाद मागण्यास महिला घाबरतात. त्यामुळे अन्याय सहन न करता कायद्याचा आधार घेवून महिलांनी प्रतीकार करावा, असे मत सहायक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांनी केले.

ठळक मुद्देवैशाली ढाले : जागृती शिबिर

आॅनलाईन लोकमतवरोरा : महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. मात्र, कायद्याच्या ज्ञानाअभावी अन्यायाविरुद्ध दाद मागण्यास महिला घाबरतात. त्यामुळे अन्याय सहन न करता कायद्याचा आधार घेवून महिलांनी प्रतीकार करावा, असे मत सहायक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांनी केले. वरोरा पोलीस ठाणे व प्रगती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या जागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. कृषी सभापती अर्चना जीवतोडे, जि.प. सदस्य सुनंदा जीवतोडे, नगसेवक सुनीता काकडे, मंगला पिंपळकर, आगलावे व अन्य मान्यवर उपस्ति होते. यावेळी विविध शेत्रामध्ये उत्कृष्ठरित्या कामगिरी बजावणाऱ्या महिलांना तसेच महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाच्या सदस्याचांसुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित लहान मुली, मुले तसेच महिलांनी नाटक संगीत व कीर्तनाच्या माध्यमातून स्त्रीभ्रूणहत्या, हागणदारी मूक्त गाव आणि हुंडाबळी अशा विविध विषयांवर समाजप्रबोधन केले. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी महिलांच्या हितासाठी पोलीस विभागाने तयार केलेल्या दामिनी पथकाची माहिती देवून त्यांच्या कार्याच्या स्वरुपाबद्दल मार्गदर्शन केले. जि. प. सभापती जीवतोडे म्हणाल्या, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महिलांनी धाडसाने पुढे येणे काळाची गरज आहे. देशाचा विकास व्हायचा असेल, तर महिलांना समानतेने वागविण्याची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. राजकीय क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे. मात्र, आरक्षणामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. संविधानाच्या तरतुदींचा आधार घेवून प्रत्येक क्षेत्रात पुढे राहावे, असेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमात सहभागी महिलांनी आजचे बदलते वर्तमान आणि महिलांच्या समस्या आदी पैलुंवर विचार मांडले. मूलभूत समस्या व विविध विषयांवर चर्चा करून एकमेकांशी संवाद साधला. प्रास्ताविक योगिता लांडगे, संचालन उज्वला पोहीनकर यांनी केले. आभार वैशाली वराटे यांनी मानले. यावेळी योगिता लांडगे , भावना रंगारी , अर्चना टोंगे , खुशबू पाल, दिपकांता लभाने आदी उपस्थित होते.