शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना अधिकाराबरोबरच सन्मान मिळावा!

By admin | Updated: March 8, 2017 00:50 IST

त्रीयांवरील होणारे शारिरीक व मानसिक अत्याचार संपुष्टात येण्यासाठी स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व समाजाची मानसिकता बदलली पाहिजे.

विजया बांगडे : महिला लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमावर कार्यशाळागडचांदूर: स्त्रीयांवरील होणारे शारिरीक व मानसिक अत्याचार संपुष्टात येण्यासाठी स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार असला पाहिजे. त्यासाठी समाजाकडून भरपूर प्रयत्न होणे गरजेचे आहे. तेव्हाच समाजात स्त्रियांना अधिकाराबरोबरच सन्मान मिळेल, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या अ‍ॅड. विजया बांगडे यांनी केले.राज्य महिला आयोग व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या निर्देशानुसार शरदराव पवार महाविद्यालयात ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१३’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेचे उद्घाटन अ‍ॅड. विजया बांगडे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून अल्ट्राटेक सिमेंटच्या सोनाली गवारगुर, तुळशिराम पुंजेकर, प्राचार्य रेणुका झंझाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह, प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, प्रा. डॉ. सुनील बिडवाईक, प्रा. डॉ.संजय गोरे, प्रा. डॉ. शरद बेलोरकर, प्रा. डॉ. सतेंद्र सिंह, शशांक नामेवार, आनंद नळे आदी उपस्थित होते.सोनाली गवारगुर यांनी महिलांनी आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य सक्षमपणे पार पाडण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले यांनी महिला स्वत:चे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचे लक्षात घेतले पाहिजे, असे सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह यांनी केले. संचालन महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष प्रा. डॉ. माया मसराम यांनी केले तर आभार समितीच्या सदस्या प्रा. अनिषा डोहे यांनी मानले. परिचय प्रा. ऊजमा खान यांनी करुन दिला.याप्रसंगी अ‍ॅड. विजया बांगडे व सोनाली गवारगुरू यांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासठाी प्रा. मंगेश करंबे, प्रिया मालेकर, शुभांगी बावणे, सोनाली मोहुर्ले, रमेश गोवर, सुभाष टेकाम, धर्मराज पोहाणे, सुरेश चांदेकर शशिकांत ढोकणे, कपील गोहणे, शंकर दाते, हरिश्चंद्र पोटे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)