राजुरा : जगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. ग्रामीण क्षेत्रातील महिलांमध्ये क्षमता आहे. त्या क्षमतेचा वापर महिलांनी संघटित होऊन एकत्र लढा द्यावा, असे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालय सभागृहात महिला मेळाव्याला संबोधित करताना पर्यवेक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डेपो व्यवस्थापक अर्चना घोडमारे, डॉ. अरविंद नांदे, डॉ. प्रशांत गाडगे, प्रा. सचिन रायपुरे, लता ठाकरे, ज्योती ठावरी, जयश्री देशपांडे, कृतिका सोनटक्के, वैशाली सुर, आशा लांडे, संध्या पलेवार, संध्या बांभुळकर, जयश्री लेंडे, पुष्पा कोडापे, कमल खुजे, रेणुका सावरकर, सुनिता कुंभारे, कमल पहानपटे, भावना ताटे, तांबेकर, पोर्णिमा जाधव, माधवी कटकू, मंगला वाटेकर, रजीन पाटणे, विशाखा राऊत, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण गोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. बी.यू. बोर्डेवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
महिलांनी संघटित होऊन लढा द्यावा- नायक
By admin | Updated: February 14, 2016 01:03 IST