शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी मतदानासाठी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:33 IST

घराला, राष्ट्राला वळण लावण्याची निसर्गदत्त देणगी महिलांना मिळाली आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान किती आवश्यक आहे, हे समाजाला पटवून देण्यासाठी महिलांनी मतदान जनजागृतीमध्ये पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.

ठळक मुद्देखेमनार : मतदान जनजागृती अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घराला, राष्ट्राला वळण लावण्याची निसर्गदत्त देणगी महिलांना मिळाली आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान किती आवश्यक आहे, हे समाजाला पटवून देण्यासाठी महिलांनी मतदान जनजागृतीमध्ये पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बालकल्याण अधिकारी आणि तहसील कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता विशेष मतदार नोंदणीचा कार्यक्रम कामगार भवन जिल्हा स्टेडियमजवळ घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी खेमनार पुढे म्हणाले, महिला या अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून समाजाकडे बघत असतात. भारतामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी पारदर्शी व सार्वत्रिक सहभागाच्या मतदानाची आवश्यकता आहे. त्यामुळे या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या वर्षा जामदार, महिला बालकल्याण समितीच्या सदस्य मनीषा नखाते, पोलीस सहाय्यक निरीक्षक एकरे आदी उपस्थित होते.यावेळी मतदार जागृती अभियान बाबतची माहिती तहसीलदार रवींद्र माने यांनी दिली. यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, पाककलाचे आयोजन केले होते. तसेच याठिकाणी महिलांकरिता ईव्हीएम आणि व्हीव्ही पटची माहिती देखील देण्यात आली. महिलांसाठी मतदार नोंदणी करिता एका विशेष नोंदणी अधिकाऱ्याची नियुक्ती करून अर्ज क्रमांक ६ चे वितरण देखील करण्यात आले. यावेळी काही महिलांच्या नावांची नोंदणी देखील नवमतदार म्हणून करण्यात आली. प्रास्ताविक अर्पणा कोल्हे, संचालन प्रिया पिंपळशेंडे तर आभार बोरीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी साक्षी कार्लेकर, संजय राईंचवार उपस्थित होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान