शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी आत्मनिर्भर होवून समाजसेवा करावी

By admin | Updated: February 15, 2017 00:49 IST

महिलांसाठी विविध क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार त्या-त्या क्षेत्राची निवड करून चांगले काम केल्यास ....

डी.के. आरीकर : राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्डतर्फे महिला संमेलनचंद्रपूर : महिलांसाठी विविध क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार त्या-त्या क्षेत्राची निवड करून चांगले काम केल्यास महिलांना आत्मनिर्भर होवून समाजाचीही सेवा करता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्डाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय महिला संमेलनात बोलताना दलितमित्र डी.के. आरीकर यांनी केले.केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या वतीने शिवाजीनगर तुकूम येथील सामाजिक सभागृहात नुकताच महिला सबलीकरणाच्या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डी.के. आरीकर उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्डाचे शिक्षण अधिकारी रत्नपारखी उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. भगवान पाटील, डॉ. देव कन्नाके, सरिता मालू, अंगणवाडी अधीक्षक रामटेके, प्रियंका वरघने, रजनी चिंचोळकर यांची उपस्थिती होती.याप्रसंगी महिलांनी कोणते क्षेत्र निवडल्यास अधिक प्रगती करता येईल, यावर रत्नपारखी यांनी मार्गदर्शन केले. रामटेके यांनी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेण्याचे आवाहन केले. डॉ. देव कन्नाके यांनी महिलांचे आरोग्य चांगले कसे ठेवता येईल, यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. भगवान पाटील यांनी महिलांना कायदेविषयक माहिती दिली.प्रास्ताविक सरिता मालू यांनी केले. संचालन प्रियंका वरघने यांनी आणि आभार रजनी चिंचोलकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना गिरडकर व उषाताई मेश्राम यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)