शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महिला म्हणतात, आम्हालाही अटक करा !

By admin | Updated: July 17, 2014 23:59 IST

तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायत हद्दीतील अमितनगर वस्तीत जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरुन मन विषन्न करणारी घटना घडली. अंधश्रद्धेने पछाडलेल्या गावकऱ्यांकडून मांत्रिक

पिंपळकर हत्याकांड : मांत्रिकाच्या शोधार्थ पोलीस आंध्रप्रदेशातबल्लारपूर : तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायत हद्दीतील अमितनगर वस्तीत जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरुन मन विषन्न करणारी घटना घडली. अंधश्रद्धेने पछाडलेल्या गावकऱ्यांकडून मांत्रिक शंकर पिंपळकरांचे हत्याकांड घडले. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली. मात्र आम्हालाही अटक करा, अशी भूमिका गावातील महिलांनी कायम ठेवल्याने पोलीस प्रशासन चक्रावून गेले आहे. गावकऱ्यांचे माथे फिरवणाऱ्या आंध्रप्रदेशातील ‘त्या’ मांत्रिकांच्या टोळीच्या शोधार्थ पोलिसांचे पथक गेल्याची माहिती आहे.अमित नगर येथील मांत्रिक शंकर पिंपळकर यांचा शनिवारच्या मध्यरात्री जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी म्हणून उपसरपंच राकेश बहुरिया, सुनिल बहुरिया, अनिल बहुरिया, कान्हु बहुरिया व राजु चव्हाण यांना अटक करुन पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. यामुळे अमितनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. मागील तीन दिवसांपासून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अंधश्रद्धेने पछाडलेल्या गावकऱ्यांच्या मनात विषाची पेरणी आंध्रप्रदेशातील मांत्रिकाच्या टोळीने केली. यामुळेच गावकरी शंकर पिंपळकर व त्यांची महिला सहकारी यांच्याविषयी कलुषित भावना बाळगून होते.अंधश्रद्धेच्या चक्रव्युहात गुरफटलेल्या अमितनगरवासियांनी तेथील मांत्रिकाचा व त्याच्या महिला सहकार्याचा काटा काढण्याच्या बेताला आंध्रप्रदेशातील मांत्रिकाच्या टोळीने खतपाणी घातले. परिणामी गावकऱ्यांच्या मारहाणीत शंकर पिंपळकर यांना जीव गमावण्याची पाळी आली. यावर गावातील बहुसंख्य महिलावर्ग मांत्रिकाला आम्ही मारले, परंतु अटक आमच्या कार्यकर्त्यांना केली, म्हणून पोलीस प्रशासनावर दोषारोप करीत आहेत, आंध्रप्रदेशातील ‘त्या’ मांत्रिकाच्या टोळीने गावकऱ्यांना चेतवल्यामुळे शंकर पिंपळकर यांचे हत्याकांड घडून आल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)