शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वादात अडकल्या पोषण आहार शिजविणाऱ्या महिला

By admin | Updated: December 2, 2014 23:03 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी खासगी महिलांकडे देण्यात आली आहे. २००२ पासून शाळेमध्ये महिला शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करीत होत्या.

चंद्रपूर: जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी खासगी महिलांकडे देण्यात आली आहे. २००२ पासून शाळेमध्ये महिला शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करीत होत्या. मात्र शासनाने एक आदेश काढून सदर महिलांना बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिलांना काढून टाकण्यात आले. मात्र पुन्हा शासनाने निर्णय बदलविण्यानंतर जुन्याच महिलांना काम देण्याचे ठरल्यानंतरही आणि मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापकांना महिलांना घेण्याचे आदेश दिले आहे. असे असताना जिल्ह्यातील १५० महिलांना अद्यापही कामावर घेण्यात आले नाही. मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वादात या महिलांना कामापासून वंचित ठेवल्या जात आहे. या विरोधात ६० महिलांनी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, कुपोषणाचे प्रमाण घटावे यासाठी शासनाने शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना सुरु केली. यानंतर शासनाने गावातील महिलांना पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी देण्यात आली. यासाठी त्यांना अत्यल्प मानधन देण्यात येते. २००२ पासून सुरु झालेल्या या योजनेमध्ये गावागावांतील अनेक महिला जुळल्या. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०१४ मध्ये शासनाने एक आदेश काढला. या आदेशानंतर जिल्ह्यातील काही शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना कामावरून कमी करण्यात आले. कामावरून काढल्याने अनेक महिलांचा रोजगार हिरावला. त्यानंतर महिलांनी शासनाला निवेदन सादर करून कामावर घेण्याची मागणी केली. त्यानंतर शासनाने १० जुलैला नव्याने आदेश काढून जुन्याच महिलांना कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्र्यपालन अधिकाऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी, तसेच मुख्याध्यापकांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचे बजावले. यानंतर काही शाळांमध्ये जुन्या महिलांना कामावर घेण्यात आले. मात्र बऱ्याच ठिकाणी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वादात आजही महिलांना कामावर घेतले नाही.शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला आणि मदतनीसांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषदसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. (नगर प्रतिनिधी)'