शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी मागितली दारू विक्रीची परवानगी

By admin | Updated: June 4, 2016 00:41 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला एक वर्ष पूर्ण झाले असताना तळोधी (बा.) येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत आहे.

मोर्चाद्वारे निवेदन : गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्रीतळोधी (बा.): चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला एक वर्ष पूर्ण झाले असताना तळोधी (बा.) येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत आहे. दारू विक्रेत्यांंना पोलिसांचे अभय मिळत असल्यामुळे दारूविक्रीला कंटाळून तळोधी (बा.) येथील महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदन देवून चक्क दारूविक्री करण्याची परवानगीच मागितली. महिलांच्या या अभिनव आंदोलनाने पोलिसांचीही चांगलीच गोची झाली आहे. तळोधी (बा.) येथे दिवसाढवळ्या पवनी (आसगाव) कान्पा मार्गे तळोधी (बा.) येथे दारू महागड्या वाहनांमधून उतरविल्या जाते. मात्र पोलिसांचे दारू विक्रेत्यांसोबत असलेल्या ‘मधूर’ संबंधामुळे दारूविक्रेत्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा महिलांचा आरोप आहे. त्यामुळे खुलेआमपणे पानठेल्यातून दारू विक्री केल्या जाते. अनेकवेळा पोलिसांना माहिती देवूनसुद्धा पोलीस वेळेवर पोहचत नाहीत. प्रत्येक वॉर्डात दारूविक्री सुरू असताना पोलीस जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी आमचे कुणी काही करु शकत नाही, अशा अविर्भावात दारू विक्रेते आपला व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे तळोधी (बा.) येथील अनेक महिलांनी तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रा.उपेंद्र चिटमलवार व दारूबंदी समितीचे अध्यक्ष सरपंच राजू रामटेके यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडली. त्यानंतर गुरूवारी सकाळी येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन दारू विक्रेत्यांवर कारवाई करा अन्यथा आम्हाला दारू परवानगी द्या, अशी मागणी महिलांनी निवेदनद्वारे ठाणेदार विवेक सोनवने यांच्याकडे केली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रा. उपेंद्र चिटमलवार सरपंच राजू रामटेके, ग्रा.पं. सदस्य विलास लांजेवार, शालू ताटकर, नलीनी वसाके व अन्य महिला उपस्थित होत्या. (वार्ताहर)