घातपाचा संशय : दुचाकीचे सुटे भाग लंपासलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथून तीन किलोमीटर अंतरावरील जुनोनाच्या जंगलामध्ये गेल्या चार दिवसांपासून एक दुचाकीचा सांगाडा बेवारस पडून आहे. या दुचाकीच्या जवळ महिलेल्या तुटक्या चपला पडून आहेत. तसेच परिसरातच दारूची रिकामी बाटली पडलेली आहे. जुनोना गाव चंद्रपूर शहराच्या जवळ आहे. या गावालगत मोठा जंगल परिसर आहे. सध्या उन्हाळा असल्याने मोठ्या प्रमाणात पानझड झाली आहे. तरीही जंगलातील काही झाडांना हिरवी पाने आहेत. त्यामुळे तेथे एकांतासह सावली असते. हे निर्जन जंगल प्रेमी युगुलांना आकर्षित करीत असते.त्या जंगलात एकांत शोधण्याकरिता चंद्रपूर शहरातील प्रेमी युगूल व इतर जोडपी जात असतात. गेल्या चार दिवसांपासून एका दुचाकीचा सांगाडा तयार होणे सुरू आहे. त्या दुचाकीचे सुटे भाग अज्ञात चोरटे लंपास करीत आहेत. दुचाकीचे एक-एक करीत सुटे भाग लंपास करण्यात आले आहेत. दोन्ही चाके, गिअरबॉक्स, सीट, हँडल, स्टँड, ब्रेक, क्लच, नंबर प्लेट आदी सुटे भाग नाहिसे झाले आहेत. परिणामी या दुचाकीला सोमवारपर्यंत केवळ इंजिन शिल्लक होते. आठ वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती ?जुनोनाच्या जंगलात आठ वर्षांपूर्वी एक तरूण व तरूणीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला होता. अज्ञात आरोपींनी घातपाताचे कृत्य केले होते. जुनोनाच्या जंगलात अनेक रहस्य दडलेले आहेत. त्या रहस्यांवरून अद्याप पडदा उचलला गेला नाही. अशातच आता या जंगलात दुचाकी, महिलेल्या तुटक्या चपला आणि दारूची रिकामी बाटली पडलेली आहे. बदनामीच्या भीतीने कोणीही पोलिसांत तक्रार केलेली नाही. जोडप्यांना शोधून लुटमार आणि इतर घटना घडत असतात. युगुलाने दुचाकी व चपला सोडून पळ काढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.वन विभागाचे दुर्लक्षजुनोनाच्या जंगलात शिल्लक राहिलेला दुचाकीच्या सांगाड्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. याशिवाय पोलिसांपर्यंतही त्याची माहिती पोहोचलेली नाही. महिलेचे तुटलेल्या चपला आणि जवळच दुचाकी असल्याचे या जंगलात काही घातपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुचाकीच्या चेसिस नंबरवरून तिच्या मालकाचा शोध घेतला जाऊ शकतो. वन विभागाचे कर्मचारी जंगलामध्ये गस्त घालत असतात. परंतु ही बाब त्यांच्यापासून अलिप्त राहिली आहे.
जुनोनाच्या जंगलात महिलेच्या तुटलेल्या चपला
By admin | Updated: May 30, 2017 00:33 IST