शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील ‘त्या’ महिलेला पोलीस बंदोबस्तात नेले उपचारासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:45 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात अंधश्रद्धेपोटी प्रकृती खालावलेल्या एका प्रसूत महिलेला उपचारासाठी नेण्यास गावकऱ्यांनी मज्जाव केला. अखेर पोलीस बंदोबस्तात जावून वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या महिलेला उपचारासाठी आरोग्य केंद्रात नेले.

ठळक मुद्देअंधश्रद्धेपोटी महिला मरणाच्या दारातशरीरात केवळ २.९ हिमोग्लोबिन

संघरक्षित तावाडेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अंधश्रद्धेपोटी प्रकृती खालावलेल्या एका प्रसूत महिलेला उपचारासाठी नेण्यास गावकऱ्यांनी मज्जाव केला. अखेर पोलीस बंदोबस्तात जावून वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या महिलेचे गाव गाठले. गावकऱ्यांचा विरोध झुगारून त्या महिलेला उपचारासाठी आरोग्य केंद्रात नेले. दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात अजूनही नागरिक पारंपरिक उपचाराला महत्त्व देत असून त्यापोटी अंधश्रद्धेत वावरत असल्याचा प्रत्यय नोकेवाडा येथे बुधवारी या घटनेवरून आला.आदिवासी कोलाम बांधवांची सुमारे ५० घरे असलेचे नोकेवाडा हे गाव जिवतीवरून १६ किमीवर आहे. नोकेवाडा या गावात मासिक पाळी व प्रसूतीनंतर महिलेला गावाबाहेर ठेवले जाते. २६ जून रोजी गावातीलच २० वर्षीय अय्युबाई बालू मडावी या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. अंधश्रद्धेपोटी गावकऱ्यांनी तिलाही घराबाहेर ठवले. अशात अय्युबाईची प्रकृती बिघडत असताना तिच्यावर गावगाड्यातले उपचार करणे सुरू होते. मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती ढासळतच गेली. ही बाब अंगणवाडी व आरोग्यसेविकेला माहिती होताच त्यांनी तिला उपचाराची अत्यंत गरज असल्याचे सांगून रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र गावकऱ्यांनी तिचा सल्ला धूडकावून लावला. वारंवार विनवण्या करूनही गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तिच्या प्रकृतीची चिंता वाटू लागली. पंधरा दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिलेल्या मातेचा जीव धोक्यात असल्याचे पाहुन ही बाब जिवतीचे संवर्ग विकास अधिकारी सुरेश बागडे यांनी सांगितली. त्यांनी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले. अखेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.पी. अनकाडे यांनी पोलीस बंदोबस्तात रुग्णवाहिकेसह आपल्या टिमला घेऊन नोकेवाडा गाव गाठले. गावकऱ्यांचा विरोध झुगारून त्या मातेला उपचारासाठी जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन लगेच तिच्यावर उपचार सुरू केले. त्या महिलेची तिथेच आरोग्य तपासणी केली असता तिच्या शरीरात केवळ २.९ हिमोग्लोबीन होते. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.पी. अनकाडे यांनी सांगितले. यानंतर सदर महिलेला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.प्रसूतीनंतर महिलेला दवाखान्यात उपचार घेण्यासाठी सांगितले, पण आम्ही नेणार नाही. ती देवाच्या कृपेने बारी होईल असेच म्हणायचे, त्यानंतर याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले- एस. एन. दुर्गे, आरोग्यसेविकासकाळी गावात जाऊन विनवणी केली की सदर मातेला उपचार घेण्यास पाठवा. पण येथील लोक मानायला तयार नव्हते. आमच्या रूढी, परंपरेचा तुम्ही अपमान करत आहात असे बोलायला लागले. तेव्हा लगेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून पोलीस बंदोबस्त घेऊन येण्यास सांगितले.- सुरेश बागडे, सं.वि.अधिकारी, जिवती.

टॅग्स :Governmentसरकार