शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बिरसा मुंडा यांच्या पराक्रमाला इतिहास साक्ष

By admin | Updated: June 13, 2016 02:34 IST

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिहार राज्यातील रांची जिल्ह्यातील उन्नीहातू येथे झाला.

सुनील येरमे यांचे प्रतिपादन : बाबुपेठ येथे बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमचंद्रपूर : बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिहार राज्यातील रांची जिल्ह्यातील उन्नीहातू येथे झाला. त्यांनी अवघे २५ वर्षे वय असताना इंग्रजांविरोधात बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले. ब्रिटिशांविरोधात क्रांती पेटविण्याचे काम बिरसा यांनी केले. १८९० मध्ये बिरसा यांच्या नेतृत्वाखाली एक सशस्त्र संघटना उभी करून क्रांतीचा वणवा बिहारभर पसरविला. त्यामुळे ब्रिटिशांना तेथे काम करणे अडचणीचे झाले होते, त्यांच्या पराक्रमाला इतिहास साक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील येरमे यांनी केले. बाबुपेठ येथे गुरूवारी आयोजित बिरसा मुंडा शहीद दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, बिरसांनी एका जाहीर सभेत कुऱ्हाडीने आपला हात कापला आणि आपल्या रक्तानी उपस्थिती आदिवासींच्या कपाळावर टिळा लावून आपल्या समाजावर होणारा अन्याय, अत्याचार, महिलावरील अत्याचाराचा बीमोड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचन दिले. तरुण वयातच बिरसामध्ये असलेल्या धाडसाला इतिहास साक्ष आहे, असे ते म्हणाले. तंट्याभिल्ल आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था बाबूपेठच्या वतीने गुरुवारी बिरसा मुंडा चौक बाबूपेठ येथे बिरसा मुंडा शहीद दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश गेडाम यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून एकनाथ कन्नाके, तुळसीदास ताडाम, दयालाल कन्नाके, डॉ. देव कन्नाके, अशोक आक्केवार आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमात रांची येथून बिरसा यांच्या समाधीवरील आणलेल्या मातीवर वृक्षारोेपण करण्यात आले. या स्थळाला श्रद्धास्थान संबोधण्यात आले. प्रास्ताविक अशोक आक्केवार तर आभार गणेश सिडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी लता पोरटे, संतोेष सिडाम, नर्मदा सिडाम, गीता मडावी, माणिक आत्राम, सिडाम आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)