शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा साहित्याविना कोळसा खाणीतील कामगारांचे कामच धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:24 IST

जिवाला धोका : केपीसीएल कंपनीचे कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क भद्रावती : तालुक्यातील कर्नाटक एम्टा, केपीसीएल खुल्या कोळसा खाणीतील कामगारांनी आपल्या सुरक्षा साहित्यासह काही इतर मागण्या घेऊन ४ ऑक्टोबर रोजी कंपनीचे काम बंद पाडून आंदोलन केले. यावर कंपनीने ८ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात तोडगा काढू, असे म्हणून आंदोलन दडपले. मात्र, अजूनही कामगारांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यांना सुरक्षा साहित्याविनाच काम करावे लागत आहे.

यामुळे केपीसीएल कामगारांमधून संताप व्यक्त केला जात असून, ते आता सुरक्षा साहित्य खरेदी करण्यासाठी भीक माँगो आंदोलन करणार असल्याचे निवेदन कामगारांनी उपमहानिर्देशक डीजीएमएस कार्यालय, नागपूर यांना दिले आहे. 

केपीसीएल कंपनीचे २०२० पासून कोळसा उत्खनन पुन्हा चालू झाले आहे. कंपनीमध्ये स्थायी कामगार २००, कंत्राटी ४०० कामगार कार्यरत आहेत कोळसा उत्खननाचे कार्य करत असताना कामगारांना नियमानुसार सुरक्षा साहित्य जसे हेल्मेट, सेफ्टी शूज, रिफ्लेक्टर जॅकेटसह इतर साहित्य दिले जाते. ते आवश्यकही आहे. मात्र, कंपनीने चार वर्षांपासून या कामगारांना सुरक्षा साहित्य दिलेच नाही. हे कामगार जीव मुठीत घेऊन कोळसा उत्खननाचे काम करत आहेत. यामुळे त्यांच्या जिवाला केव्हाही धोका होऊ शकतो. असा प्रकार कोळसा खाण क्षेत्रात पहिल्यांदाच केला जात आहे. साधे कामगारांना सुरक्षा उपकरण पुरवले जात नाही तर कामगारांच्या इतर मागण्यांचे काय होत असेल, हे कळून येते. 

११ दिवसात मागण्या मान्य करा, अन्यथा भीक मागून घेणार साहित्य २२ दिवसात केपीसीएल कंपनीने कामगारांच्या मागण्या मान्य करत सुरक्षा साहित्य पुरवले नाही तर भद्रावती परिसरात भीक माँगो आंदोलन करणार असल्याचे निवेदन उपमहानिर्देशक डीजेएमएस नागपूर यांना अरविंद देवगडे यांनी २०० कामगारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पाठवले आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर