शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
4
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
5
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
6
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
7
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
8
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
9
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
10
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
11
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
12
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
13
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
14
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
15
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
16
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
17
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
18
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
19
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
20
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

कोरपना तालुक्यातील पोचमार्ग डांबरीकरणाविना

By admin | Updated: December 29, 2014 23:39 IST

कोरपना तालुक्यातील अनेक पोचमार्ग अद्यापही डांबरीकरणाविनाच आहे. दहा वर्षापूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडता यावे, या हेतुने प्रत्येक गावातून पोचमार्ग तयार करण्यात आले.

रत्नाकर चटप - नांदाफाटाकोरपना तालुक्यातील अनेक पोचमार्ग अद्यापही डांबरीकरणाविनाच आहे. दहा वर्षापूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडता यावे, या हेतुने प्रत्येक गावातून पोचमार्ग तयार करण्यात आले. यामध्ये मुरुम गिट्टी टाकून रस्त्यांचे सपाटीकरण करण्यात आले. मात्र अनेक वर्ष लोटूनही डांबरीकरण न झाल्याने गिट्टी उघडी पडली असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील चनई-धनकदेवी, शरज-हेटी, कोरपना-पारडी, जेव्हरा-गांधीनगर, कोरपना-कातलाबोडी, बोरगाव-कातलाबोडी, पिपर्डा-कारगाव, हातलोणी-कोरपना, कोडशी-तुळशी-कोरपना, भिप्पा- मांगलहिरा, नांदाफाटा-लालगुडा, बिबी-राजुरगुडा, आवारपूर- कोलापूरगुडा-कढोली-वनोजा, बाखर्डी-निमनी-गोवरी, आवारपूर-गाडेगाव, हिरापूर-पालगाव, कवठाळा-विरूर, लखमापूर-भुटरा, धुनकी-निमनी, बाखर्डी-नांदाफाटा, नोकारी-पिंपळगाव, नांदाफाटा-आसन, भोयगाव-भारोसा, लखमापूर-कारव आदी पोचमार्ग उखडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास कठीण होत आहे. यातील अनेक पोचमार्ग शेतातून जातात. या मार्गासाठी शेतकऱ्यांनी काही प्रमाणात आपल्या जमीनी दिल्या आहेत. तर औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या पोचमार्गामुळे धुळ उडत असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत आहे. मात्र, शेतातून पोचमार्ग गेल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना चिखलातून जाण्याचा त्रास कमी झाला. परंतु, आता या रस्त्यांची अवस्था वाईट झाली असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. बऱ्याच पोचमार्गावर छोटे-छोटे पुल तयार करण्यात आले आहे. काही पुलाला तडे गेलेले दिसत असून या पुलांची दुरुस्ती करणे नितांत गरजेचे आहे. त्याचबरोबर पुलाची उंची कमी असल्याने शाळकरी मुले व शेतकऱ्यांना पावसाळ्यात खोल पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पोचमार्गावरुन एक चारचाकी वाहन जाण्याइतपत जागा राहत नाही. रस्त्याच्या कडेला झुडपे वाढली आहेत. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा वेध घेणे कठीण होत आहे. गिट्टी उखडल्याने दुचाकी वाहनांचे अपघात झाल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. तालुक्यात अंबुजा, अल्ट्राटेक, माणिकगड व मुर्ली अ‍ॅग्रो अशा चार सिमेंट कंपन्या आहेत. यामध्ये अनेक कामगार १० ते १५ किमी अंतरावरुन कामाला जातात. रात्रपाळीला अंतर व वेळ वाचविण्यासाठी पोचमार्गानेच प्रवास केला जातो. परंतु, रस्ता खराब झाल्याने वाहन चालविणे धोक्याचे ठरत आहे. काही लोकप्रतिनिधींनी आपल्या सत्ता काळात गावाशी-गाव जोडता यावा या हेतुने पोचमार्ग तयार केले. यासाठी लाखो रुपयाचा निधी खर्च झाला. परंतु, डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत पोचमार्ग जैसे-थे आहेत. केवळ आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या लोकप्रतिनिधींचे लक्ष मात्र या रस्त्यांकडे नाही आणि प्रशासनही बघ्याची भूमिका घेऊन आहे.