लिकेजमुळे पाणीपुरवठा योजना बंद : गावकऱ्यांना टँकरने पाणीपुरवठानंदोरी : भद्रावती तालुक्यातील विस्लोन येथे १ कोटी २० लाखांची प्रादेशिक जल योजना राबविण्यात आली. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून पळसगाव ते विस्लोन जलवाहिनी नादुरुस्त असल्याने विस्लोनवासीयांचा पाणी पुरवठा बंद आहे. वारंवार लेखी तक्रारी करूनही जलाहिनी दुरुस्त केली जात नसल्याने कृत्रीम पाणी टंचाई निर्माण करून विस्लोन येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ही विस्लोनवासीयांची थट्टा असून हक्काचे पाणी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी २० लाखांचा निधी खर्ची घालून सुद्धा नियोजनबद्ध काम झाले नाही व शासकीय नियमांची पायमल्ली केल्याने गावकऱ्यांत रोष पसरला आहे. जलवाहिनीची दुरुस्ती न करता टँँकरने पाणी पुरवठा करून शासकीय तिजोरीला छेद लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)
विस्लोनवासीयांना हवे हक्काच्या योजनेचे पाणी
By admin | Updated: April 20, 2016 01:23 IST