शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘काश...’ लघु चित्रपटातून ग्रामीण कलाकार करणार हेल्मेटवर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 22:14 IST

चंद्रपूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर लघु चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माता राजू रहिकवार आणि गणेश रहिकवार दिग्दर्शित ‘काश’ असे या लघु चित्रपटाचे नाव असून जिल्ह्यातील मातीत घडलेल्या ग्रामीण कलाकारांनी साकारलेल्या प्रभावशाली भूमिका या लघु चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

ठळक मुद्देराजुरा, बल्लारपूर, चंद्रपुरात चित्रीकरण : लघु चित्रपट निर्मितीचे एक पाऊल पुढे

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : चंद्रपूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर लघु चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माता राजू रहिकवार आणि गणेश रहिकवार दिग्दर्शित ‘काश’ असे या लघु चित्रपटाचे नाव असून जिल्ह्यातील मातीत घडलेल्या ग्रामीण कलाकारांनी साकारलेल्या प्रभावशाली भूमिका या लघु चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे नागरिक यामुळे अपघातात निरपराधांचा हकनाक बळी जात आहे. या पाश्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात नुकतीच दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली. याचा अचूक वेध घेत हेल्मेटच्या जनजागृतीसाठी राजू रहिकवार व गणेश रहिकवार बंधूनी सामाजिक बांधिलकी जोपासत लघुचित्रपट करायचे ठरविले.या लघुचित्रपटात वडील आपल्या मुलाला हेल्मेट घेण्यासाठी पैसे देतो. परंतु, मुलगा त्या पैसाची मित्रासोबत पार्टी करुन मनसोक्त दारु ढोसतो. या दारुच्या नशेत तो वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत सिग्नल तोडतो. भरधाव दुचाकी चालविण्याच्या नादात त्याच्या दुचाकीचा अपघात होतो आणि यात मुलाचा मृत्यू होतो. काश... मुलाने डोक्याला हेल्मेट घातले असते तर अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नसती आणि त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला नसता.एकंदरीत या लघुचित्रपटाचे सर्व कथानक हेल्मेट जनजागृतीभोवती फिरते. या लघुचित्रपटात काम करणारे सर्व कलाकार ग्रामीण भागातील असून अविनाश दोरखंडे (वडील) संगीता बावणे (आई), सुरज आमटे (पुत्र) महेंद्र खंडेलवार (पोलीस निरीक्षक, सुरेश बानोत (हवालदार) या सर्व कलाकारांनी या चित्रपटात प्रभावशाली भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातून हेल्मेटच्या जनजागृतीवर भर देण्यात आला आहे.मेकअप, केशरचना सजावट वर्षा दोरखंडे, राधिका दोरखंडे यांनी केली आहे. त्यामुळे या लघु चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील, असा विश्वास निर्मात्याला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण राजुरा, बललारपूर, चंद्रपूर परिसरात करण्यात येत आहे. हेल्मेटच्या जनजजागृतीवर आधारीत असलेला या लघुचित्रपटात ग्रामीण कलाकारांनी चित्रपट निर्मितीसाठी टाकलेले पाऊल नक्कीच आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे.