लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यात अनेक घरांचे छप्पर उडाले. वृक्ष उन्मळून पडली.चंद्रपूर सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अचानक वादळ सुटले. त्यानंतर वादळी पावसाला सुरुवात झाली. वादळामुळे फुटपाथवरील दुकानांचे साहित्य, चौकाचौकात लागलेले फलक, काही दुकानांवरील टिना उडून रस्त्यावर आले. कोरपना, राजुरा, गडचांदूर, मूल परिसरातही वादळी पाऊस झाला. राजुरा तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. घुग्घुस परिसरात जोरदार वादळ आले. त्यानंतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. गारपीटही झाली. दरम्यान, बसस्थानक परिसरातील फुटपाथवरील चहाटपºयावरील छते उडाली. यात अनेकांचे नुकसान झाले.
जिल्ह्यात वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:22 IST
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यात अनेक घरांचे छप्पर उडाले. वृक्ष उन्मळून पडली.
जिल्ह्यात वादळी पाऊस
ठळक मुद्देअनेक घरांचे छप्पर उडाले : वातावरणात पुन्हा गारवा