शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचे तांडव

By admin | Updated: March 18, 2017 00:34 IST

कर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची जोरदार मागणी अधिवेशनात सुरू आहे.

शेकडो घरांची छप्परे उडाली पिकांचे अपरिमित नुकसान, घरांचीही पडझडआशिष देरकर कोरपनाकर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची जोरदार मागणी अधिवेशनात सुरू आहे. अशातच निसर्गराजा शेतकऱ्यांवर कोपला असून जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीटीचे तांडव सुरू आहे. पाच दिवसांत तब्बल दोनदा अवकाळी वादळी पावसाने तांडव करून शेतकऱ्यांना पुरते हतबल करून सोडले आहे. गुरुवारी सायंकाळी ६-७ वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यात व इतर ठिकाणी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांना अक्षरश: रडायला भाग पाडले. या वदाळाच्या तडाख्यात अनेकांच्या घरांची छप्परे उडाली तर हजारो हेक्टरवरील पीक जमीनदोस्त झाले आहे.गुरूवारच्या वादळी पावसाने कोरपना तालुक्यातील गडचांदूर, नांदा, बिबी, आवारपूर, हिरापूर, सांगोडा, अंतरगाव, गाडेगाव, विरुर, भोयगाव, भारोसा, कवठाळा, तळोदी, बाखर्डी, निमनी, लखमापूर, उपरवाही, पिंपळगाव, खिर्डी, इंजापूर व परिसरातील गहू, ज्वारी, हरभरा, कापूस, मिरची इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अल्पावधीतच हाती येणारे पीक क्षणात अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडून जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.प्रातिनिधीक स्वरूपात सांगायचे झाल्यास तालुक्यातील बिबी येथील शेतकरी महादेव थेरे या तरुण शेतकऱ्याचे खुप मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या घरचा गुरांचा गोठा पडून छोट्या वासराचा मृत्यू झाला व काही जनावरे जखमी झाली. शेतात नुकतेच हरभरा पीक कापून ढीग करून ठेवले होते. मात्र सकाळी जाऊन बघितले असता, ढिगारा नष्ट होऊन हरभरा शेतात अस्ताव्यस्त पसरून दूरवर उडाल्याचे दिसून आले. तळोधी येथील शेतकरी विठ्ठल गोहोकार, अरविंद गोहोकार व योगेश गोखरे यांच्याही घरांचे छत, जनावरांचा गोठा, साठवून ठेवलेला कापूस, जनावरांचा चारा, घरगुती धान्याचे वादळी पावसाने नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरील टीनाचे छत उडाल्याने घरात पाणी पडून अनेक वस्तू भिजल्या. बाखर्डी येथील शेतकरी हरिभाऊ जेनेकर यांचा घरावर ठेवून असलेला कापूस वादळी पावसाने अक्षरश: उडवून नेला. दारात जागा अपुरी असल्यामुळे त्यांनी घरावर अंदाजे चार ते पाच क्विंटल कापूस ठेवला होता. मात्र वादळाच्या तडाख्यात घरावरील कापूस उडाला व तो भिजल्याने बेकामी झाला आहे. या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची हिच अवस्था दिसून आली. चांगले पीक घेता यावे म्हणून बँकांचे कर्ज घेतले. जुने कर्ज फेडून नवीन कर्ज घेत नव्याने शेती कसण्याची वेळ आली असताना अवकाळी पावसाने सर्वस्व हिरावले. बँकांचे जुने कर्ज फेडण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा, हा माझ्यासमोर बिकट प्रश्न आहे.- महादेव थेरे, शेतकरी, बिबी.अचानकच्या वादळी पावसाने धावाधाव झाली. अनेक शेतकऱ्यांचे गहू व हरभरा या पिकांचे शेतात ढिगारे होते. मात्र वादळी पावसामुळे ढिगारे झाकण्यासाठी शेतात पोहोचता आले नाही. यात हातचे पीक बिनकामी झाले आहे.- हरीदास जेनेकर, शेतकरी, बाखर्डी