शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांवरील अन्याय खपवून घेणार नाही

By admin | Updated: July 11, 2016 00:54 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणि कारखाने उभारण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे धोरण शासनाने निर्माण केले आहे.

मुकुंद खैरे : दुर्गापूर येथे समाज क्रांती आघाडीची शाखा स्थापनचंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणि कारखाने उभारण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे धोरण शासनाने निर्माण केले आहे. त्यामुळे यापुढे स्थानिक बेरोजगारांवर अन्याय करण्यात आल्यास तो खपवून घेणार नाही, असा इशारा समाजक्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे यांनी दिला. दुर्गापूर येथे समाजक्रांती आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली.यावेळी प्रा. खैरे बोलत होते. खैरे पुढे म्हणाले की, औद्योगिक विकासातून राज्यातील सर्व सूक्ष्म, लघु, मोठ्या व विशाल औद्योगिक उपक्रमामध्ये किमान ८० स्थानिक उमेदवारांना नौकऱ्यामध्ये प्राधान्य देण्याचे धोरण शासनाने अवलंबिलेले आहे. त्यानुसार सर्व उद्योग घटकांनी लोकांना पर्यवेक्षकीय श्रेणीत ५० व इतर श्रेणीत ८० कर्मचारी नियुक्त करावी.हा निर्णय शासनाने १७ नोव्हेंबर २००८ रोजी घेतला परंतु अलीकडे एमएसईबी पॉवर प्लॉन्टस व डब्ल्यूसीएल (कोळसा खाणी) अंतर्गत कार्यरत सेन्थिल इंटरप्राईजेस, पदमापूर ओसीएम मधील स्थानिक कामगारांना कंपनीचे दीड वर्षे काम समोर असूनही काढण्यात आले. रिक्त जागेवर परप्रांतीयांना कामावर घेतल्या जात असल्याने परिसरातील बेरोजगार युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुर्गापूर परिसरातील बेरोजगारांच्या कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन होत असल्याने समाजक्रांती आघाडी बेरोजगारांवर होत असलेल्या अन्यायाविरूद्ध बेरोजगारांना संघटीत करून उद्योग मालकावर कायदेशीर आंदोलनाद्वारे दबाव निर्माण करणार आहे, असेही ते म्हणाले.दुर्गापूर येथे समाज क्रांती आघाडीच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते प्रज्योत पुणेकर, उपाध्यक्ष उमेश नगराळे, सचिव अहमद पठान, सहसचिव शेख ताहीर भाई, संघटक दशरथ गेडाम आणि सहसंघटक म्हणून रवींद्र नागपुरे यांची निवड करण्यात आली. पद्मापूर शाखा अध्यक्षपदी विकास शामकुंवर यांना नियुक्त करण्यात आले.स्थानिक बेरोजगारांचा प्रचंड लढा उभारण्याचे दृष्टिने लवकरच बेरोजगारांचा महामेळावा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्याचे ठरले. बेरोजगारांनी आपल्या कायदेशीर अधिकारासाठी संघटनेचे सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन जिल्हा युवा आघाडी प्रमुख रवी धवन यांनी केले. प्र्रास्ताविक तालुका प्रमुख अरुण चवरे यांनी केले. जिल्ह्याचे जेष्ठ कार्यकर्ते सागर बोरकर, अमर नगराळे, सविता कांबळे, आशिर्वाद भोयर, रंजन जीवने, ज्ञानेश्वर खोब्रागडे, ज्योती मेश्राम आदींची उपस्थिती होती. संचालन प्रज्योत पुणेकर यांनी केले तर आभार दशरथ गेडाम यांनी मानले. (प्रतिनिधी)