शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पेरीव पत्र सादर न करणारे अनुदानापासून वंचित राहणार

By admin | Updated: April 6, 2017 00:31 IST

राज्यातील सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षीच्या हंगामात अत्यल्प उतारी मिळाली. सोयाबिनला दरही कमी मिळाले.

सोयाबीन उत्पादक शेतकरी : निबंधक कार्यालयाने अर्ज नाकारलेवरोरा : राज्यातील सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षीच्या हंगामात अत्यल्प उतारी मिळाली. सोयाबिनला दरही कमी मिळाले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबिन विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान शासनाने जाहीर केले. परंतु अनुदानाकरिता शेकडो शेतकऱ्यांनी सोयाबिन नमुद असलेले पेरीव पत्र व सातबारा जोडला नाही. त्यामुळे शेतकरी सोयाबिन अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यात वर्तविली जात आहे.चालू हंगामात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ३१ डिसेंबर पुर्वी सोयाबिन विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान शासनाने जाहीर केले. एका शेतकऱ्याला वीस क्विंटल पर्यंत अनुदान मिळणार आहे. अनुदानाकरिता बाजार समितीकडे सादर केलेल्या अर्जासोबत बाजार समितीकडे माल विकल्याची पावती, आधार कार्ड, बँक पासबुकाची सांक्षाकीत प्रती जोडण्यात आल्या आहेत. बाजार समितीने अनुदानाचे अर्ज सहाय्यक निबंधक व जिल्हा निबंधक कार्यालयाकडे सादर केले. अर्जाची सदर कार्यालयाने छाननी केली तेव्हा, सन २०१६-१७ या वर्षातील सोयाबिन पेरा प्रमाणपत्र तसेच सातबारावर सोयाबिन पीक नमूद असणे आवश्यक असल्याचा शेरा निबंधक कार्यालयाने मारला. त्यामुळे शेकडो सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबीत पडले आहेत. त्यामुळे पेरापत्र व सातबारावर सोयाबिन पेरा नमूद असलेले कागदपत्र जोडले नाही असे शेकडो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शासनानेच यामध्ये काही नियामत सुधारणा करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)बाजार समितीचे आवाहन ज्या सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनी अनुदानाकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराकडे अर्ज सादर केले आहे व ज्यांनी सन २०१६-१७ वर्षातील सोयाबिनचे पेरपत्रक किंवा सोयाबिन नमूद सातबारा जोडला नाही, त्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये पेरापत्रक द्यावे, असे आवाहन सभापती विशाल बदखल, उपसभापती राजू चिकटे, सचिव चंद्रशेन शिंदे व संचालक मंडळाने केले आहे.