शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील विद्यार्थ्यांना सुखरुप आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:01 IST

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व अन्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व काही खासगी रूग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले. ताडोबा व अन्य ठिकाणी विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : परदेशासह अन्य राज्यातून आलेल्या ३३ नागरिकांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चीन, इटली, इराण, दुब्बई, सौदी अरब तर अन्य राज्यातून आलेले १७ असे एकूण ३३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण आढळला नाही, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील पुण्यात शिकत आहेत. त्यांना चंद्रपुरात आणण्यासाठी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी ना. वडेट्टीवार म्हणाले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व अन्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व काही खासगी रूग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले. ताडोबा व अन्य ठिकाणी विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. जिल्ह्यातून विदेशात गेलेल्या व संभाव्यता या काळात परत येणाºया प्रवाशांच्या नोंदीही घेणे सुरू आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांमधून प्रवास केलेल्यांना कॉरेन्टाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्राचीन व ऐतिहासीक अशी २५ मार्चपासून गुढीपाडव्याच्या पर्वावर सुरू होणारी महाकाली यात्रा स्थगित करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी होणाºया कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यात आला. आरोग्यासाठी नागरिकांनी लग्नकार्य, सामाजिक संघटनांच्या सभा,, यात्रा, महोत्सव, जन्मदिवस, उर्स, धार्मिक कार्यक्रम, सहली, स्नेहसंमेलन आदी कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केले.१७ विद्यार्थी धोक्याबाहेरकर्नाटकातील गुलबर्गा येथे जिल्ह्यातील १७ मुले शिकत होती. त्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांना चंद्र्रपुरात आणण्यात आले. कोरोनाच्या भितीमुळे नागरिक आपापल्या गावाकडे परत येत आहेत. मात्र काही खासगी बसेस चालक प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी कुणाकडूनही वाढीव पैसे घेऊ नये, याकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले.

कोलारा येथे संशयित रूग्णचिमूर : मासळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या एका संशयित रूग्णाला सतर्कतेचा इशारा म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल पेटकर यांनी सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोलारा गेट परिसरात असलेल्या एफडीसीएम रिसोर्टमधील एक कर्मचारी सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आला होता.कोरोनाबाबत डॉक्टरांमध्येही गैरसमजचंद्रपूर : कोरोना व्हायरसची बाधा कोरोनाचा प्रादूर्भाव असलेल्या देशातून, राज्यातून तसेच शहरातून आलेल्या नागरिकांना होण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय या नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांनाही बाधा होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन अशा प्रत्येक नागरिकांना देखरेखीखाली ठेवून त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहे. यामध्ये ते निगेटीव्ह आढळल्यास आरोग्य विभागाची यंत्रणा सुटकेचा श्वास घेत आहे. यामध्ये आरोग्य विभागाचा ताण चांगलाच वाढला आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही डॉक्टर त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही रुग्णांना खोकला वा ताप असल्याचे लक्षात येताच त्यांना कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवत आहे. सामान्य रुग्णालयात आल्यानंतर त्या रुग्णांमध्ये कोरोनाचे एकही लक्षण दिसून येत नसल्याचेही पुढे आले आहे. यामध्येही आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा वेळ वाया जात आहे. शिवाय डोक्यालाही ताप होत आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूरातील डॉक्टरांची कार्यशाळा घेऊन त्यांना कोरोनाबाबतची सविस्तर माहिती दिली. याउपरही सुज्ञ वर्गाकडून हा प्रकार घडत असल्याची चर्चा आरोग्य विभागात आहे.मॉस्कचा तुटवडाबल्लारपूर : शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. भीतीमुळे नागरिकांनी मास्क लावणे सुरू केले. त्यामुळे मेडिकल स्टोअर्समध्ये मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे, अशी माहिती मेडिकल स्टोअर्सचे संचालक कैलास खंडेलवाल यांनी दिली. नगर परिषद व खासगी प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया मध्यान्ह भोजनाचे काय करायचे, हा प्रश्न शिक्षकांनी विचारला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना