शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांची शेतात जागली

By admin | Updated: November 16, 2014 22:48 IST

शेतकऱ्यांना यावर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लष्करी अळी, कोरडा दुष्काळ यासारख्या अडचणींतून सावरत नाही तोच वन्यप्राणी शेतपिकाची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीलाही

राजुरा : शेतकऱ्यांना यावर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लष्करी अळी, कोरडा दुष्काळ यासारख्या अडचणींतून सावरत नाही तोच वन्यप्राणी शेतपिकाची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीलाही शेतात जागली जावे लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून आहे. शेतकऱ्यांना दरवर्षीच कोणत्या ना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागत असते. यावर्षीच्या हंगामात आधी लष्करी अळीने पिकांवर हल्ला चढविला. त्यानंतर गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. यातून वाचलेले पीक वाचविण्याचे प्रयत्न सुरु असताना आता वन्यप्राण्यांचा त्रास वाढला आहे. शेतात कापणी करून ठेवलेल्या पिकांवर रानडुकरांनी धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. त्यामुळे हाती आलेल्या पिकांच्या रक्षणासाठी आता बळीराजाला थंडीच्या दिवसांत रात्री जागावे लागत आहे. कोरपना, राजुरा तालुक्यातील भोयेगाव, भारोसा, विरूर, गाडेगाव, जैतापूर, नांदगाव, कवठाळा, एकोडी, कुर्ली, मारडा, पेल्लोरा, धिडसी, वरोरा, साखरी, चार्ली निर्ली, कडोली, गोवरी, पोवनी, बाबापूर, मानोली, चुनाळा, चनाखा, सातरी, विहिरगाव, नलफडी, सुर्ती, सोंडो, सुमठाना, वरूर, पाचगाव, चिंचोली, अंतरगाव यासह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर डुकर, हरीण, रोई व कोल्हा आदी वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी रात्र जागून पिकांचे रक्षण करीत आहेत. रानडुकरांचे कडप शेतात धुमाकूळ घालून उभे पीक नष्ट करतात. तसेच कापणी झालेल्या पिकांचीही नासधूस करतात. पीक वाचविण्यासाठी घडपड सुरु असून रामेश्वर निमकर या शेतकऱ्याचे तीन एकर शेतातील धानपीक वन्यप्राण्यांने नष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)