शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुतळा उभारताना प्रशासनाने आक्षेप का घेतला नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST

चंद्रपूर : चक्क वर्दळीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामागे, बीएसएनएल कार्यालयाशेजारी भगवान बिरसा मुंडा पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असताना आणि पुतळा ...

चंद्रपूर : चक्क वर्दळीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामागे, बीएसएनएल कार्यालयाशेजारी भगवान बिरसा मुंडा पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असताना आणि पुतळा उभारताना प्रशासनाने काहीच आक्षेप कसा घेतला नाही, असा प्रश्न निवृत्त प्रशासकीय अधिकारी व ज्येष्ठ विचारवंत प्रभू राजगडकर यांनी उपस्थित केला. चंद्रपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता ते ‘लोकमत’शी बोलत होते.

चंद्रपूर महानगरपालिकेने भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू राजगडकर म्हणाले, ज्याअर्थी पुतळा उभारला त्याअर्थी उभारण्याबाबतचे सोपस्कार पूर्ण केले असावेत, हे गृहीत धरावे लागेल. पुतळ्यासाठी चबुतरा आदी बांधकाम सुरू होते. पुतळाही बसवला आणि अचानक दोन दिवसांनी मनपा प्रशासनाने क्रेनने उचलून नेला. त्याची मोडतोड झाली का, तो जप्त करून कुठे ठेवला का, हेही आदिवासींना कळू दिले नाही. याबाबतची वस्तुस्थिती पुतळा समिती व माध्यमांनी जनतेसमोर मांडावी. परंतु, पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असताना आणि पुतळा उभा उभारल्यानंतरही प्रशासनाने काहीच आक्षेप कसा घेतला नाही. घेतला असेल तर पुतळा समितीने त्यावर काय केले, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे, याकडेही राजगडकर यांनी लक्ष वेधले.

ही तर सामंतवादी मानसिकता

संसदेत तैलचित्र लावून भगवान बिरसा मुंडा यांचा सन्मान केला जात आहे. मात्र, या महापुरुषाचा चंद्रपुरातील पुतळा अशा अमानुष तऱ्हेने क्रेनने उचलून नेणे म्हणजे बिरसा मुंडा यांचा उपमर्दच नव्हे तर आदिवासींना आम्ही मोजत नाही, असा हा दंभ आहे. आदिवासींना कोणत्याही तऱ्हेने अपमानित केले तरी काहीच फरक पडत नाही, ही सामंतवादी मानसिकता असल्याने तरुणाईने संविधानिक चौकटीतून प्रतिकार केला पाहिजे, असेही राजगडकर यांनी चर्चेदरम्यान म्हणाले.

सन्माननीय तोडगा काढावा

ब्रिटिश राजवटीत आदिवासींवर अन्याय झाल्याने बिरसा मुंडा यांनी लढा दिला. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांतही अन्याय होत असेल तर आदिवासींनी काय करायला हवे, हे कोणी सांगू शकेल? त्यामुळे यावर प्रशासन, सर्व राजकीय पक्ष, आदिवासी समाज, पुतळा समिती व सर्वांनी मिळून तातडीने सन्माननीय तोडगा काढावा, अशी अपेक्षाही राजगडकर यांनी व्यक्त केली.