शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर मनपाच्या एक सदस्यीय वॉर्ड रचनेत कोण बाजी मारणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 05:00 IST

चंद्रपूरसह राज्यातील काही महानगरपालिकांची मुदत फेब्रुवारी २०२२ रोजी संपणार आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेना, बसपा, तसेच अन्य आघाड्यांनी आतापासूनच चंद्रपुरात बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. राजकीय गणित लक्षात ठेवूनच भूमिपूजन कार्यक्रमांचा सपाटा सुरू झाला आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी चंद्रपूर शहर कार्यकारिणी गठित करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या सोपविल्या. आम आदमी पक्षानेही शहरातील सर्वच प्रभागांत प्रचाराच्या भिंती रंगविल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेतील बहुसदस्यीय वॉर्डरचना प्रणाली रद्द करून आगामी निवडणुकीसाठी एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीचा कच्चा आराखडा सादर करण्याचा आदेश धडकताच चंद्रपूर मनपा प्रशासन शुक्रवारपासून कामाला लागले. यापूर्वीच्या वॉर्डरचनेत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. परिणामी,  एक सदस्यीय वॉर्डरचनेत कोणता पक्ष बाजी मारणार, या चर्चेला मनपाच्या राजकीय वर्तुळात तोंड फुटले आहे. चंद्रपूरसह राज्यातील काही महानगरपालिकांची मुदत फेब्रुवारी २०२२ रोजी संपणार आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेना, बसपा, तसेच अन्य आघाड्यांनी आतापासूनच चंद्रपुरात बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. राजकीय गणित लक्षात ठेवूनच भूमिपूजन कार्यक्रमांचा सपाटा सुरू झाला आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी चंद्रपूर शहर कार्यकारिणी गठित करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या सोपविल्या. आम आदमी पक्षानेही शहरातील सर्वच प्रभागांत प्रचाराच्या भिंती रंगविल्या. मुदत संपणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे सहा महिने शिल्लक आहेत.  राज्यात भाजप सत्तेत असताना बहुसदस्यीय वॉर्डरचना प्रणालीचा मोठा लाभ झाला. आता राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर ३१ डिसेंबर २०१९ महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा अधिनियमअंतर्गत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यानुसारच, निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय वॉर्डरचना प्रणाली रद्द करून आगामी निवडणूक एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीचा कच्चा आराखडा सादर करण्याचा आदेश जारी केला आहे.

...असे असतील एकसदस्यीय वॉर्डरचनेचे निकषचंद्रपुरातील नवीन प्रभागरचनेसाठी २०११ मध्ये झालेल्या लोकसंख्येलाच ग्राह्य धरण्यात येईल. यापूर्वीच्या हद्दीत झालेले बदल, विकासकामे आणि योजनांमुळे झालेला भौगोलिक बदल, नवीन रस्ते, सार्वजनिक इमारती, पूल आदींचाही  विचार केला जाणार आहे. याशिवाय, निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून चंद्रपुरातील नवीन प्रभागांचा कच्चा आराखडा तयार केला जाणार आहे.

निवडणूक आयोगाचा आदेश मिळताच शुक्रवारपासून एकसदस्यीय वॉर्डरचना आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू  केली आहे. या प्रक्रियेला काही दिवसांचा कालावधी लागेल. आराखडा तयार झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.- राजेश मोहिते, आयुक्त मनपा, चंद्रपूर

बहुसदस्यीय वाॅर्ड रचना रद्द झाल्याने भाजप व काँग्रेसचे दावे-प्रतिदावे

कोटमनपाच्या बहुसदस्यीय वॉर्डरचनेतून विकासात अडचणी येतात. समन्वयाचाही अभाव असतो. ही त्रुटी एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीमुळे दूर होईल. राज्य शासनाचा निर्णय योग्यच आहे. या निर्णयामुळे विकासाला चालना मिळेल.- रामू तिवारी, जिल्हाध्यक्ष शहर काँग्रेस, चंद्रपूर

बहुसदस्यीय वॉर्डरचनेतून एकापेक्षा अधिक व्यक्तिंना नेतृत्व करण्याची संधी मिळते. मात्र, एकसदस्यीय वॉर्ड रचनेतून हे शक्यच नाही. राज्य सरकारच्या निर्णयामुळे सक्षम उमेदवारालाही प्रतिधित्वापासून वंचित राहावे लागेल. हा निर्णय अन्यायकारकच आहे.- डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हाध्यक्ष, महानगर भाजप, चंद्रपूर

 

टॅग्स :Electionनिवडणूक