शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

तर अपघातग्रस्तांना कोण मदत करणार ?

By admin | Updated: March 26, 2015 00:59 IST

सज्जनाचा पुरस्कार आणि दुर्जनांचा धिक्कार, हे पोलीस खात्याचे ब्रीद. पोलीस प्रशासन जनतेचे मित्र, अशी समाजात प्रतिमा.

संतोष मेश्राम चिचपल्लीसज्जनाचा पुरस्कार आणि दुर्जनांचा धिक्कार, हे पोलीस खात्याचे ब्रीद. पोलीस प्रशासन जनतेचे मित्र, अशी समाजात प्रतिमा. परंतु चिचपल्ली येथे झालेल्या ट्रक अपघातात अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभागामार्फत झालेली कारवाई मात्र अन्यायकारक असल्याने नागरिकांमध्ये असंतोष उफाळून येत आहे. झालेल्या प्रकारामुळे पोलीस खात्याची प्रतिमा समाजात मलीन झालेली आहे.झाले असे की चंद्रपूर - मूल मार्गावर एक ट्रक सिमेंट बॅग भरून रायपूरला निघाला होता. चिचपल्ली गावाजवळ विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे वाहनावरील संतुलन बिघडले. त्यात रस्त्याच्या मधोमध ट्रक पलटी झाला. त्यात जवळपास पाचशे सिमेंटचे बॅग्स होते. रस्त्याच्या कडेला गोंडसावरी येथील छत्रपती रामचंद्र घाटे हे आपली दुचाकी रस्त्याचा बाजुला उभी करून मोबाईलवर बोलत होते. झालेल्या अपघातामुळे ट्रकमधील सिमेंट बॅग त्यांच्या अंगावर पडल्याने तो त्यात पूर्णपणे दबला गेला. उपस्थित जनसमुदायांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याला बाहेर काढले. तो मृत्यूशी झुंज देत होता. नागरिकांनी समयसुचकता दाखवित तात्काळ त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. शेवटी मृत्यूचाच विजय झाला. हतबल झालेले नागरिक मृतदेह घेऊन घटनास्थळावर दाखल झाले आणि पोलीस यंत्रणेचे वाट बघू लागले. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. परंतु वेळेवर कोणीही हजर होऊ शकले नाही. जवळपास दोन ते तीन तासांनी रामनगर येथील पोलीस आपल्या पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरूद्धात नारेबाजी केली. जोपर्यंत मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका मृताच्या परिवारासह नागरिकांनी घेतल्यामुळे पेच निर्माण झाला. पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करावयाची होती. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करीत मृताच्या पत्नी व वडिलाला अमानुषपणे मारहाण करीत मृतदेह ताब्यात घेतला. त्यामुळे उपस्थितांनी नारेबाजी केली. त्यामुळे भांबावलेल्या पोलिसांनी अनेकांना दंगा नियंत्रण पथकाद्वारे बदलून काढले. या सर्व घटनेची एका युवकाने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकार्डिंग केली. आपले दुष्कृत्य चव्हाट्यावर येणार, या भीतीपोटी पोलिसांनी त्या युवकाचा पाठलाग करून त्याचा मोबाईल ताब्यात घेतला व उपस्थित असलेल्या व सहकार्य करणाऱ्या १९ व्यक्तीवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले.त्याची रात्रीच्या सुमारास धरपकड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिकामध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकरवी होत असलेल्या अत्याचारामुळे जनमाणसात असंतोष खदखदत असून भविष्यात एखादी असा प्रसंग उद्भवला तर मदतनीस म्हणून कोण पुढे जाणार, असा सुर सध्यातरी चिचपल्ली परिसरात उघडपणे व्यक्त होत आहे.