शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवरील पांढरे पट्टे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST

उद्योग आहे, पण एमआयडीसी नाही कोरपना : तालुका निर्मिती होऊन बराच कालावधी लोटला आहे. मात्र येथे एमआयडीसी नसल्याने बेरोजगारांना ...

उद्योग आहे, पण एमआयडीसी नाही

कोरपना : तालुका निर्मिती होऊन बराच कालावधी लोटला आहे. मात्र येथे एमआयडीसी नसल्याने बेरोजगारांना कामासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. विशेष म्हणजे, कोरपना तालुक्यात सिमेंट कंपन्या आहेत. मात्र येथे स्थानिकांना कामच मिळत नसल्याची स्थिती आहे. कोरपना येथे एमआयडीसीची निर्मिती करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची मागणी आहे.

चंद्रपुरात परकोटाच्या भिंती ढासळतायेत

चंद्रपूर : शहरात असलेल्या परकोटाची दुरवस्था झाली आहे. याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मागील काही दिवसांपासून परकोट अनेक ठिकाणी पडला आहे. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

मुदतीत मिळत नाही वीज बिल

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विजेचे बिल वेळेत मिळत नसल्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीविरुध्द रोष व्यक्त केला जात आहे. अनेकवेळा ग्राहकांना विलंब शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

चंद्रपुरात डुकरांचा मुक्तसंचार

चंद्रपूर : स्थानिक बालाजी वाॅर्ड, वडगाव तसेच अन्य भागामध्ये डुकरांचा मुक्तसंचार असल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत. या डुकरांमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

डास प्रतिबंधक औषध फवारणीचा विसर

चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा, समाधी वॉर्ड, घुटकाळा, तुळशीनगर, वृंदावननगर, तसेच तुकूम परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महानगरपालिकेने नाल्यांची स्वच्छता करून डास प्रतिबंधक औषध फवारणी करणे गरजेचे आहे.

ग्राहकांना दिले जाते चाॅकलेट

चंद्रपूर : सध्या सुट्या पैशांची टंचाई आहे. त्यामुळे व्यावसायिक सुट्या पैशांऐवजी ग्राहकांना चॉकलेट किंवा अन्य वस्तू देऊन त्यांचे समाधान करीत आहेत. मात्र यामध्ये ग्राहकांचेच नुकसान होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन ही ग्राहकांची लूट थांबविणे गरजेचे आहे.