शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी अभयारण्य येथील नाईट सफारीला वन्यप्रेमींचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:01 IST

नव्यानेच निर्माण झालेल्या घोडाझरी अभयारण्यात नाईट जंगल सफारी सुरु करण्यात येणार आहे. याला ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत काम करणाऱ्या वन्यजीवप्रेमी व संस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या संदर्भात सभा घेऊन ब्रह्मपुरी वनविभागाला निवेदन दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : नव्यानेच निर्माण झालेल्या घोडाझरी अभयारण्यात नाईट जंगल सफारी सुरु करण्यात येणार आहे. याला ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत काम करणाऱ्या वन्यजीवप्रेमी व संस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या संदर्भात सभा घेऊन ब्रह्मपुरी वनविभागाला निवेदन दिले आहे.घोडाझरी अभयारण्यात प्रजासत्ताक दिनी नाईट जंगल सफारी सुरु करण्यात येत असल्याची माहिती वन्यजीवप्रेमींना मिळाली. ही नाईट सफारी वन्यजीव व मानव वन्यजीव संघर्षाला कारणीभूत ठरेल, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. आधीच ब्रह्मपुरी वनविभागात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोह्चला आहे. यातच वनविभाग सफारी सुरु करू, असा विचार करीत आहे. यामुळे वन्यजिवाच्या अधिवासावर विपरित परिणाम होत आहे. त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊन त्यांचे भ्रमण मार्ग खंडित होणार आहे. निशाचर वन्यजिवांचे अपघाताचे प्रमाण वाढणार आहे. वन्यजिवांना शांत वातावरण न मिळाल्यास ते गावाकडे येतील आणि त्यातून मानवावर हल्ले वाढण्याचे प्रमाण वाढेल. नाईट सफारी सुरु केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे आजीवन प्रचारक सूर्यभान खोब्रागडे, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेकर, तरुण पर्यावरण मंडळाचे अमोद गौरकर, विरेंद्र हिंगे, जगदीश पेंदाम, झेप निसर्ग सरंक्षण संस्थेचे पवन नागरे, अमित देशमुख, अमोल वानखेडे, डॉ. मेश्राम, पर्यावरण सवर्धन समितीचे कवडु लोहकरे, अवार्ड संस्थेचे गुणवंत वैद्य, सहजीवन संस्थेचे प्रकाश पोतराजे, यशवंत कायरकर उपस्थित होते.