पुरातन वास्तूला धोका : संबंधित विभागाचे दुर्लक्षवरोरा : राज्य शासनाने वरोरा तालुक्यातील भटाळा गावाला पर्यटन म्हणून घोषित करीत पर्यटन विभागाने विकासात्मक कामेही केली. या पर्यटन स्थळाच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात पांढऱ्या गोट्याचे उत्खनन करून वाहतूक सुरू केली जात असल्याने या पर्यटन स्थळातील पुरातन वास्तुला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वरोरा तालुक्यातील भटाळा गावाच्या परिसरात हेमाडपंथी शिवलिंग मंदिर, पुरातन भवानी मंदिर व ऐतिहासिक ऋषी तलाव आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पांढऱ्या दगडांच्या उंच टेकड्या आहे. त्यामध्ये प्रसिद्ध सिताफळाचे वनही आहे, अनेक छोटे तलाव झाडे-झुडपी असल्याने या ठिकाणावरुन निर्सगाचे अनोखे दर्शन होत असते. या वास्तुची पाहणी व अभ्यास करण्याकरिता परदेशी व भारताच्या कानाकोपऱ्यातील इतिहास तज्ज्ञ आजही येत असतात. यामुळेच मागील काही वर्षापूर्वी राज्य शासनाने भटाळा गावाचा परिसराला पर्यटनाचा दर्जा देत पर्यटन विभागाचे काही विकासात्मक कामालाही प्रारंभ केला. पर्यटनस्थळ घोषित झाल्याने त्या परिसरातील तीन किमी पर्यंतच्या जागेत कुठलेही उत्खनन करता येत नाही. परंतु या परिसरात आधीच पांढऱ्या गोट्याच्या खदानींना परवानगी दिली. यामधून आजही मजुरांकरवी पांढरे गोटे काढून वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. ही वाहतुक पहाटे होते. (तालुका प्रतिनिधी)
भटाळा पर्यटनस्थळ परिसरात पांढऱ्या गोट्याचे उत्खनन
By admin | Updated: June 29, 2015 01:37 IST