शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅन आॅफ द ईयर’ पुरस्काराने गौरव होताना

By admin | Updated: September 20, 2016 00:43 IST

‘मॅन आॅफ द ईयर’ पुरस्काराने गौरवांकित होत असताना राज्यात १ जुलै २०१६ रोजी लोकसहभागातून...

लिम्का बूक आॅफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळणे आनंदाचे जेसीआयतर्फे सुधीर मुनगंटीवार यांचा ‘मॅन आॅफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानचंद्रपूर : ‘मॅन आॅफ द ईयर’ पुरस्काराने गौरवांकित होत असताना राज्यात १ जुलै २०१६ रोजी लोकसहभागातून लावण्यात आलेल्या २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची नोंद घेतल्याचे लिम्का बूक आॅफ रेकॉर्डचे प्रमाणपत्रही आजच मिळाले. या दोन्ही गोष्टी खुप आनंददायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल मरीन लाईन्स (जेसी) च्या वतीने रविवारी पद्मविभूषण डॉ. बी. के गोयल यांच्या हस्ते वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ‘मॅन आॅफ द ईयर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘उमन आॅफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशन लि. च्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, पद्मश्री डॉ. उज्ज्वल निकम, जेसीचे फाऊंडर चेअरमन जीवराज शहा, इंदर जैन, प्रेम लुनावत यांच्यासह जेसीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात डॉ. सुजाता वासानी आणि डॉ. अमित कुमार शर्मा यांना ‘आऊटस्टॅण्डिंग यंग पर्सन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. याआधी ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल तर्फे स्व. प्रमोद महाजन, स्व. आर आर पाटील, महानायक अमिताभ बच्चन, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे , केंद्रीच मंत्री नितिन गडकरी यांना सन्मानित करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)वृक्ष लावणे प्रत्येकाच्या जीवनाचे कर्तव्य झाले पाहिजे वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ लाख ५२ हजार लोकांच्यावतीने आपण हा पुरस्कार स्वीकारतो, असे सांगत ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, माणसाला श्वासांसाठी लागणारा आॅक्सीजन झाडांपासूनच मिळत असल्याने वृक्ष लावणे हे प्रत्येकाच्या जीवनाचे कर्तव्य झाले पाहिजे. येत्या तीन वर्षात राज्यात ५० कोटी झाड लावण्याचा शासनाचा संकल्प असून येणाऱ्या १ जुलै २०१७ च्या ३ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात जेसीनेही सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वत: कमवलेले पैसे स्वत:साठी खर्च करणे हा माणसाचा स्वभाव असतो. परंतु, स्वत: कमवलेले पैसे समाजासाठी खर्च करणे ही भारतीयांची संस्कृती आहे आणि जेसी ही संस्कृती पुढे नेत असल्याचेही त्यांनी सांगितले.