शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तळोधी (बा) बसस्थानकावरील पथदिवे केव्हा सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 01:30 IST

तळोधी (बा.) ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ असल्याने सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तळोधी (बा) ग्रामपंचायतकडे पाहिले जाते.

जनतेचा सवाल : दोन वर्षांपासून काळोखाचे साम्राज्य तळोधी (बा) : तळोधी (बा.) ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ असल्याने सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तळोधी (बा) ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून तळोधी (बा.) येथील बसस्थानकावरील संपूर्ण ४८ पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस बसस्थानकावर पूर्णत: काळोख असतो. पथदिवे केव्हा सुरू करणार, याकडे जनतेने लक्ष वेधले आहे. तळोधी (बा.) ह्या गावाची लोकसंख्या २० हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे या गावाला एका छोट्या शहराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. येथे सर्व सुविधा असल्याने तळोधी (बा) हे शहर तालुक्याच्या उंबरठ्यावर आहे. या गावाचा आजु-बाजूच्या ४२ गावांशी दररोजचा संबध येत असतो. तळोधी (बा.) येथे मोठा बाजार भरतो. त्याला परिसरातील गावांचे नागरिक येत असतात. या बाजारीकरणाच्या दृष्टिकोनातून लोकांची रेलचेल होत असते. याठिकाणी अनेक शाळा- महाविद्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती, धान्यगंज, पोलीस स्टेशन व अनेक शासकीय कार्यालये आहेत. तळोधी (बा) बसस्थानकावर पाच वर्षांपूर्वी तत्कालीन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या स्थानिक विकास निधीतून दुभाजक व पथदिवे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला. ती कामे पूर्ण करण्यात आली. त्यावेळी दोन-तीन वर्षे बसस्थानकावर रोषणाई दिसत होती. मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून एक-एक पथदिवे बंद होत गेले. ते पथदिवे बदलण्याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले. बसस्थानकापासून काही अंतरावर साई मंदिर व पोलीस ठाणे आहे. या मार्गाने सुसाट वेगाने गाड्या धावत असतात. त्यामुळे अनेकवेळा दुभाजकावरील खांबाला मोठ्या वाहनाने धडक देऊन अपघात झाले. तसेच साई मंदिरासमोरील खांबाला ट्रकने धडक दिली असता ट्रक चालकाकडून नुकसान भरपाई घेण्यात आली. मात्र अजूनपर्यंत खांबावर पथदिवे लावण्यात आले नाही. या मार्गावर पथदिवे बंद असल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे मार्गावर साप-विंचू मार्गक्रमण करीत असतात. त्यावेळी अनेक साईभक्तांना व प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागत आहे. तळोधी (बा) ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे लोकांना बसस्थानकावर रात्री अंधाराचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधी व वरिष्ठांनी निर्देश देऊन त्वरित पथदिवे सुरू करावे, अशी मागणी तळोधी (बा) येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)