शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

भावी शिक्षकांची परवड कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:13 IST

अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही शासनाने शिक्षकभरतीसाठी टीईटी उत्तीर्ण परिक्षार्थ्यांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. मात्र अद्यापही कोणतीही भरतीची प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे पदवीकाधारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.

ठळक मुद्देशिक्षक बनने ठरत आहे दिवास्वप्न : पदवीधारक सीईटीच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही शासनाने शिक्षकभरतीसाठी टीईटी उत्तीर्ण परिक्षार्थ्यांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. मात्र अद्यापही कोणतीही भरतीची प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे पदवीकाधारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.पूर्वी झटपट नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएडकडे बघितल्या जात होते. डीटीएडची पदवी धारण करुन बाहेर पडल्याबरोबरच शिक्षकाची नोकरी मिळायची. मात्र त्यानंतर शासनाने अनेक खासगी महाविद्यालयाला परवानगी दिली. त्यामुळे दरवर्षी शिक्षक पदविका घेणारे लाखों विद्यार्थी बाहेर पडू लागले. त्यामुळे शिक्षक पदविका धारण केलेल्या विद्यार्थ्यांची फौज तयार झाली.त्यातही शासनाने शिक्षकांसाठी आवश्यक पात्रता असताना टीईटी परीक्षा सुरु केली. टीईटी परीक्षा उत्तीर्णच विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी पात्र ठारणार होता. मात्र अनेक डीटीएड व बीएड पदविधारकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झालीच नाही. त्यातही शासनाने टीईटीधारकांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. पदवीकाधारकांनी ती परीक्षाही उत्तीर्ण केली. मात्र अद्यापही शासनाकडून कोणतीही भरती प्रकिया होत नसल्यामुळे पदवीकाधारकांचे शिषक बनण्याचे स्वप्न भंग होत आहे.पवित्र पोर्टल ठरतेय डोकेदुखीशासनाने मागील काही महिन्यांपूर्वी २० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केली. त्यामुळे पदवीकाधारकांच्या इच्छा जागृत झाल्या होत्या. त्यासाठी पवित्र पोर्टवरल अर्ज करायचे होते. अनेकांनी पोर्टलद्वारे अर्ज केले. मात्र अर्ज केल्यानंतरही विद्यार्थ्यांची अर्जाची पत्र निघाली नाही. त्यानंतर अर्जाची पत्र काढण्यासाठी व अर्जात दुरुस्ती करण्यासाठी रोल नंबरनुसार कालावधी देण्यात आला. यामध्ये अनेकांनी दुरुस्ती केली. मात्र दुरुस्ती झाली नाही. तसेच अर्जाची पत्रही निघाली नाही. त्यामुळे शिक्षक भरतीची घोषणा केवळ घोषणाबाजीतर नाहीना असा प्रश्न पदविकाधारकांना पडत आहे.खासगी शाळेत लाखोंची रुपयांची मागणीशासनाच्या नव्या धोरणानुसार खासगी शाळेतील शिक्षकांची भरती परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे. मात्र याची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याने खाजगी शाळेत शिक्षणसेवक तसेच साहाय्य शिक्षक भरतीसाठी संस्थाचालकांकडून लाखो रुपयांचे डोनेशनची मागणी केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य पदविधारक ही रकम भरण्यास असमर्थ आहे. परिणामी शैक्षणिक पात्राता असूनही विद्यार्थ्यांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले आहे.