शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
3
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
4
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
5
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
6
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
7
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
8
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
9
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
10
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
11
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
12
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
13
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
14
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
15
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
16
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
17
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
18
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
19
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
20
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!

‘त्या’ भ्रष्टाचारासंबंधी कारवाई केव्हा होणार ?

By admin | Updated: March 28, 2016 01:00 IST

तालुक्यातील भेंडवी ग्रामपंचायतीमध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला असून पोलिसात तक्रार देऊनही कुठलीही कारवाई होत नाही.

बी.यू.बोर्डेवार/शंकर मडावी ल्ल राजुरातालुक्यातील भेंडवी ग्रामपंचायतीमध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला असून पोलिसात तक्रार देऊनही कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे भेंडवीचे ग्रामवासी आनंद गेडाम व गावातील नागरिक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून निवेदन देणार आहे.राजुरा तालुक्यातील भेंडवी गावात फेरफटका मारला असता गावातील नागरिकांनी गावाच्या समस्या पत्रकारांसमक्ष मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने ५८ लाखांची पाण्याची टाकी मागील दोन वर्षापासून धूळ खात आहे. राजुरा येथील पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या टाकी बांधकाम करताना रोख पुस्तकात अजूनही नोंदी नाही. रोख पुस्तक कोरे आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले. अजूनपर्यत ही पाण्याची टाकी ग्रामवासीयांना हस्तांतरित केलेली नाही. त्यामुळे येथील महिला पाण्यासाठी त्रस्त आहेत.या ठिकाणी अंबुजा फाऊंडेशनने एक बंधारा बांधला. त्या बंधाऱ्याला लोखंडी दारच नाही. या बंधाऱ्याच्या बाजुला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. शतकोटी वृक्ष लागवड योजना राजुरा तालुक्यात राबविण्यात आली. ती योजना रोजगार हमी अर्धे-तुम्ही अर्धे आम्ही या प्रमाणेच असून वृक्ष नसताना वृक्षाच्या देखभालीचा खर्च ग्रामपंचायतीने केलेला आहे. सोलर लाईट, टावर बंद पडलेले असून शौचालय तयार करण्यासाठी आणलेल्या विटा धूळ खात पडलेल्या आहे. अस्वच्छ नाल्या असून आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने काहीच उपाययोजना केलेली नाही. या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्या. शासकीय अधिकारी यांनी अहवाल दिला. परंतु राजुराचे संवर्ग विकास अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे अजूनपर्यंत तक्रार झालेली नाही. राजुराचे संवर्ग विकास अधिकारी अहवाल पाठवून मोकळे झाले. चंद्रपूरचे संबंधित अधिकारी किंवा संवर्ग विकास अधिकारी यांनी तक्रार दिली तर गुन्हा दाखल करू, असे पोलीस अधिकारी म्हणतात. लाखोंचा भ्रष्टाचार होवूनही कारवाई होत नसल्याचे पाहून गावातील नागरिक न्यायालयात दाद मागणार आहेत.पोलीस पाटलांवरच आहेत गुन्हे दाखलराजुरा : पोलीस पाटील पोलिसांची व त्या गावाची चांगली प्रतिमा सांभाळीत असतो. परंतु पोलीस पाटलावरच गुन्हे दाखल असेल तर ते गावाला काय न्याय देणार. अशीच परिस्थिती भेंडवीत आहे. त्यांना पोलीस पाटील करू नये, यासाठी येथील १०० नागरिकांनी तक्रार केली. तक्रारीत म्हटले आहे की संतोष सलाम यांच्यावर गुन्हे दाखल असून अशा व्यक्तीला पोलीस पाटील पदावर नियुक्ती केल्यास गावातील शांतता व सुव्यवस्था भंग होऊन गावातील वातावरण दूषित होईल. आनंद गेडाम, भगवान मडावी, सुभाष उईके, सुनीता गेडाम, शशिकला परचाके, पुष्पा गेडाम, जंगुबाई मंगाम यासह शंभर नागरिकांनी तक्रार करूनही संतोष सलाम हे पोलीस पाटील नियुक्त झाले. या पोलीूस पाटलावर भादंवी ४२०, ४६८, ४७१, २०० अन्वये गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीसुद्धा भादंवीच्या ५०९, २९४, ५०६, ३२३, १४३, १४७, ४२७, २९४, ६०६, १४३, ४७७, ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यातून ते निर्दोष मुक्त झाले. या तक्रारीमध्ये जातीचा घोळ असल्याचेसुद्धा म्हटले आहे. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला पोलीस पाटील कसे नियुक्त केले, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडेसुध्दा २४ नोव्हेंबर २०१५ ला याची रितसर तक्रार करण्यात आली. परंतु अजूनपर्यंत साधी चौकशीही झाली नाही, या बद्दल गावकरी खंत व्यक्त करीत आहेत.