शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लस घेण्यासाठी आमचा नंबर केव्हा लागणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी १ मार्चपासून ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील नागरिकांच्या (ज्यांना इतर आजार आहेत) लसीकरणासाठी नोंदणी ...

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी १ मार्चपासून ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील नागरिकांच्या (ज्यांना इतर आजार आहेत) लसीकरणासाठी नोंदणी सुरू झाली. जिल्ह्यात २० शासकीय लसीकरण केंद्रात मोफत आणि सात खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयात लस देण्याचा निर्णय झाला. सर्व शासकीय शासकीय केंद्रात लसीकरण सुरू झाले. पण, सामान्य नागरिकांचा ओढा शासकीय लसीकरण केंद्राकडेच असल्याने गर्दी दिसून येत आहे. यावर पर्याय म्हणून जिल्ह्यात व चंद्रपूर मनपा आरोग्य विभागाअंतर्गत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या केंद्रांची जागा लवकरच जाहीर केली जाणार आहे. को-विन अ‍ॅपवरील नोंदणी व नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना असल्याने लसीकरणाला थोडा विलंब होत आहे. या विलंबावर मात करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.

चंद्रपुरातील ‘त्या’ खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू

शासकीय केंद्रात लसीकरण सुरू असतानाच शासनाने खासगी केंद्रासाठी नवीन निकष लागू झाले. त्यामुळे डॉक्टरांनी चार दिवसांची मुदतवाढ मागितली. परिणामी, मानवटकर, क्राइस्ट, वासाडे, बुक्कावार, संजीवनी, मुसळे खासगी हॉस्पिटलमधील कोरोना लसीकरण लांबणीवर गेले. आवश्यक सुविधांची व्यवस्थांची पूर्तता झाल्यानंतर सहा खासगी केंद्रांमध्येही आता लसीकरण सुरू झाले आहे.

कर्मचारीअभावी पोलीस केंद्राचे मनपाकडे हस्तांतरण

पोलीस विभागासाठी स्वतंत्र केंद्र सुरू झाले होते. केंद्रात सामान्य नागरिकांना लस मिळत नव्हती. मात्र, या केंद्रात आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झाली. अखेर मनपा आरोग्य विभागाने हे केंद्र स्वत:कडे घेतले. शिवाय, बंगाली कॅम्प व अन्य ठिकाणी लसीकरण केंद्रांची तयारी केली आहे.

६ हजार १७६ ज्येष्ठांचे लसीकरण

सोमवारपर्यंत ६ हजार १७६ व्याधीग्रस्त व ज्येष्ठांनी पहिल्या टप्प्यातील लस घेतली. दुसऱ्या टप्प्यातील कोविड लस घेणारे हेल्थ केअर वर्कर व फ्रन्ट लाइन वर्कर व सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असा दावा जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, चंद्रपूर मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांनी केला आहे.