शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जिल्हाधिकारी चक्क कापूस वेचतात तेव्हा.

By admin | Updated: November 10, 2015 00:56 IST

जिल्हाधिकारी म्हटले की वातानुकूलित कक्षात बसून प्रशासन चालविणारा अधिकारी अशीच प्रतिमा मनात उभी राहते. मात्र

चंद्रपूर : जिल्हाधिकारी म्हटले की वातानुकूलित कक्षात बसून प्रशासन चालविणारा अधिकारी अशीच प्रतिमा मनात उभी राहते. मात्र जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर हे मागील दोन दिवसांपासून विविध तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन चक्क कापूस वेचत आहेत.सुधारित आणेवारी व सरासरी उत्पादनाची नोंद घेण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी शेताता जाऊन शेताची पाहणी करतात आणि पीक परिस्थितीचा आढावा घेतात. मागील दोन दिवसात त्यांनी कोरपना, जिवती, राजुरा, मूल व बल्लारपूर तालुक्यातील शेतांची पाहणी केली तर सोमवारी भद्रावती व वरोरा तालुक्यातील शेतांना भेटी दिल्या.पाऊस कमी जास्त अथवा नैसर्गिक आपत्तीने झालेल्या शेतपीक नुकसान भरपाईसाठी महसूल विभागाने घोषित केलेली आणेवारी शासन विचारात घेते. पैसेवारीबाबत बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या तक्रारीसुध्दा असतात. यावर्षी अशाच तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याची पीक पैसेवारी अचुक रहावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्वत: शेतांना े भेटी देऊन पिकांची पाहणी करण्याची मोहीम सुरू केली आहे.सोमवारी भद्रावती व वरोरा तालुक्यातील अनेक शेतांना भेटी देऊन त्यांनी कापूस व सोयाबीन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या कापूस लागवड क्षेत्र असलेल्या शेतातील १० बाय १० चा प्लाट निवडून त्यातील कापसाची वेचणी व मोजणी जिल्हाधिकारी यांनी स्वत: शेतकरी व कर्मचाऱ्यांसोबत केली. यावरून पिकाची सरासरी उत्पादकता किती हे ठरविण्यास मदत होणार आहे.पहिला वेचा, जमीन हलकी की भारी याचाही विचार करण्यात येणार आहे. घोडपेठ येथील शेतात जिल्हाधिकारी यांनी सोयाबीनची पाहणी केली. तर त्याच ठिकाणी कापसाची पाहणी करून वेचणी केली असता १० बाय १० च्या प्लाटमध्ये कोरडवाहू तसेच हलक्या जमिनीत सरासरी एकरी चार ते साडेचार क्विंटल कापसाचा अंदाज आला. भारी जमिनीत ९ ते १० क्विंटल सरासरी असा अंदाज आला.दीपक म्हैसेकर यांच्यासोबत तहसीलदार सचिन कुमावत यांनी नंदोरी येथील महादेव तुकाराम तिखट यांच्या शेतात कापूस वेचून सरासरी उत्पादन नोंद केले. त्याचबरोबर चिनोरा येथील सुनील कटारिया या शेतकऱ्याच्या शेतातही अशाच प्रकारे कापसाची सरासरी उत्पादकता नोंदविण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार प्रमोद कदम होते. (शहर प्रतिनिधी)