शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लोकवाहिणीची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी सोमवारच्या मध्यरात्रीपासून पगार वाढीसाठी महाराष्ट्र कामगार संघटना इंटक व कृती समितीने संप पुकारला. या संपाला चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी या एसटी आगारातील सर्वच संघटनेच्या कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतल्याने लोकवाहिणीची चाके थांबली होती. त्यामुळे सर्व बसस्थानकांवर शुकशुकाट पसरला होता.राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना ...

ठळक मुद्देबसस्थानकावर शुकशुकाट : एसटीच्या संपाने प्रवाशांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी सोमवारच्या मध्यरात्रीपासून पगार वाढीसाठी महाराष्ट्र कामगार संघटना इंटक व कृती समितीने संप पुकारला. या संपाला चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी या एसटी आगारातील सर्वच संघटनेच्या कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतल्याने लोकवाहिणीची चाके थांबली होती. त्यामुळे सर्व बसस्थानकांवर शुकशुकाट पसरला होता.राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना अत्यल्प वेतन मिळते. या वेतनामध्ये परिवाराचे पालणपोषण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहेत. राज्य महामंडळातील कर्मचाºयांचा करार १ मार्च २०१६ ला संपला. यात एक वर्षाचा कालावधी लोटूनही शासनाने कर्मचाºयांचा करार केला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाºयात असंतोष पसरला होता. या असंतोषाचे रूपांतर एसटी कर्मचाºयांनी संपात केले आहे.जिल्ह्यातील पाचही आगारातील चालक, वाहक, यांत्रिकी यांच्यासह कार्यालयीन कर्मचाºयांनी संपात सहभागी होत आगारात १०० टक्के सहभाग दर्शविल्याचे चित्र होते. गावाला जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करीत आपल्या गावाला जावे लागले. या संपामुळे प्रवाशाचे मोठे हाल झाले तर मिळेल त्या साधनाने प्रवाशांनी आपले गाव जवळ केले. एसटीच्या या संपाने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे.आरटीओंनी केली वाहतुकीची व्यवस्थाजिल्हाभरातील एसटी बसगाड्या संपामुळे बंद असल्याने अनेक प्रवासी अडकले होते. याची दखल घेत चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ५० बसगाड्यांची व्यवस्था करून प्रवाश्यांना सोडून दिले. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला.