शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

व्हाट्सअपमुळे मिळाली बेपत्ता झालेली मुलगी

By admin | Updated: May 13, 2016 01:06 IST

राजुरा शहरातील आंबेडकर वॉर्डातील कृतिका शंकर तामखाने (१०) ही मुलगी अचानक सायंकाळी ६ वाजता गायब झाली.

लोकमतचेही प्रयत्न : राजुऱ्यावरून गेली बल्लारपूरलाराजुरा : राजुरा शहरातील आंबेडकर वॉर्डातील कृतिका शंकर तामखाने (१०) ही मुलगी अचानक सायंकाळी ६ वाजता गायब झाली. जिकडे तिकडे शोधशोध केली. परंतु मिळाली नाही. याची माहिती शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्राचार्य दौलतराव भोंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली आणि लोकमतच्या प्रयत्नामुळे अखेर कृतिकाला आई-वडिलांच्या सुपुर्द करण्यात आले.कृतिका घरून बेपत्ता झाल्यानंतर काही तास लोटताच व्हाट्सअपवर बल्लारपूर पोलीस ठाण्याचा एक मॅसेज होता की, बल्लारपूर बसस्थानकावर एक दहा वर्षाची मुलगी मिळाली आहे. याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला व्हाटस्अपमुळे मिळाली. त्यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता त्या मुलीचे नाव प्रिया प्रविण वनकर (१०) रा. आंबेडकर वार्ड, नागपूर असे असल्याचे सांगितले. सदर मुलीने तेच नाव पोलिसांना सांगितले होते. मात्र यात शंका निर्माण झाल्यामुळे बल्लारपूरच्या पोलिसांनी ताबडतोब मुलीचे छायाचित्र लोकमत प्रतिनिधी बी.यू. बोर्डेवार यांच्या व्हाटस्अपवर पाठविले. ते छायाचित्र घेऊन प्रा.बी.यू. बोर्डेवार, बादल बेले, प्रविण देशकर हे सदर मुलीच्या घरी गेले. त्यानंतर बेपत्ता झालेली कृतिका तेच असल्याचे निष्पन्न झाले. आई- वडिलांनी छायाचित्र पाहताच कृतिकाला ओळखले. त्या मुलीचे नाव प्रिया वनकर नसून कृतिका शंकर तामखाने (१०) आहे, हे सिध्द झाले. मात्र मुलीने नाव चुकीचे का सांगितले, याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. मुलगी भेटण्याचा आनंद आई-वडीलांना झाला. लगेच आई- वडिल बल्लारपूर पोलीस स्टेशनला पोहचून आपल्या मुलीला राजुरा येथे घेऊन आले. सोशल मिडियाचा सध्या वाट्टेल तसा वापर सुरू आहे. मात्र याचा चांगला व लोकोपयोगासाठी व जनजागृतीसाठी केला तर त्याचे निश्चित चांगले परिणाम होतात, हे या प्रकारावरून दिसून आले. बल्लारपूर पोलीस आणि लोकमतचे नागरिकांनी कौतुक केले. (शहर प्रतिनिधी)