शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतील एक हजार संपकऱ्यांचे पुढे काय होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST

शासनामध्ये विलीनीकरण करावे,या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी हत्यार उपसले हा संप सुरूच आहे. बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांचे  हाल होत आहे. दरम्यान,पाच हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली. कामावर येण्यासाठी अनेकदा आवाहन करूनही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली. ११८  कर्मचाऱ्यांचे निलंबन केले, तर ४८ कर्मचाऱ्यांची बदली केली. परंतु, तरीही कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळला शासकीय विलीनीकरण करण्याची शक्यता उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मावळली. सध्या २०० कर्मचारी कार्यरत आहेत. संपकरी एक हजार कर्मचारी २२ एप्रिल २०२२ पर्यंत रुजू न झाल्यास त्यांना सेवामुक्त करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनामध्ये विलीनीकरण करावे,या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी हत्यार उपसले हा संप सुरूच आहे. बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांचे  हाल होत आहे. दरम्यान,पाच हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली. कामावर येण्यासाठी अनेकदा आवाहन करूनही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली. ११८  कर्मचाऱ्यांचे निलंबन केले, तर ४८ कर्मचाऱ्यांची बदली केली. परंतु, तरीही कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. 

१००० कर्मचारी संपात

- जिल्ह्यातील सर्व आगारातून एक हजार कर्मचारी अजूनही संपावर आहेत. एसटीचे राज्य सरकारात विलीनीकरण अशक्य असल्याचे सरकारने उच्च न्यायालयात  सांगितले. त्यावर न्यायालयाने उपजीविकेचे नुकसान करू नका, अशा सूचना संपकऱ्यांना केल्या. २२ एप्रिलपर्यंत रुजू होण्याचेही कर्मचाऱ्यांना कळविले.

 १२५ बसेसवरच मदार - संप सुरूच असल्याने सध्या १२५ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरविले जात आहे. हे बसेस प्रामुख्याने मुख्य मार्गावर जाणारे आहेत. ग्रामीण व दुर्गम भागात अजूनही बसेस सोडल्या जात नाही. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

जिल्ह्यातील ८० बसेस बंद- बसफेऱ्या सुरळीत करण्यासाठी एका खासगी कंपनीमार्फत ५० कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.-  हे कर्मचारी रुजू झाले. मात्र,अजूनही ८० बसेस बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण दूर झाली नाही.

 उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारावर प्रवाशांना सेवा देणे सुरू आहे. प्रवाशांची कोणतीही अडचण होऊ नये, यादृष्टीने नियोजन करून अंमलबजावणी केली जात आहे.- स्मिता सुतावणे, विभागीय वाहतून निरीक्षक, चंद्रपूर

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप