शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी विषयात देशकर गप्प का?-वडेट्टीवार

By admin | Updated: August 30, 2015 00:43 IST

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी आहे. मात्र दररोज लाखो, करोडो रुपयांची अवैध दारू पकडली जात असून याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी आहे. मात्र दररोज लाखो, करोडो रुपयांची अवैध दारू पकडली जात असून याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. काहींना अटकही करण्यात येत आहे. वर्तमानपत्राच्या माध्यमातून सदर बाब उघड होत असताना दारूबंदी विषयावर प्रा.अतुल देशकर गप्प का आहेत, असा सवाल प्रत्युत्तरादाखल आ.विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ज्यावेळी दारू सुरू होती, त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारखान्यातील दारू जिल्ह्यात येत होती. तो त्यांचा व्यवसाय आहे. परंतु दारूबंदीनंतर त्यांचा संबंध या विषयात येतोच कुठे, असा प्रश्नही आ.वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. दारूबंदीचा निर्णय भाजपाने घेतला. तो जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभर अंमलात आणला असता तर त्यांच्या सरकारला शाबासकी मिळाली असती, अशी कोपरखळीही वडेट्टीवार यांनी हाणली.चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर एक थेंबही दारू विकली जात नाही. सात महिन्यात एकदाही दारू पकडली नाही. एकाही माणसावर गुन्हा दाखल झाला नाही, असे देशकर यांनी छातीठोकपणे सांगावे व माझ्याविरोधात अवमान याचिका दाखल करावी, असे आव्हानही त्यांनी देशकर यांना दिले आहे. (प्रतिनिधी)